Shreya Maskar
दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे अनेकांच्या घरात दिवाळीचा फराळ बनवायला सुरूवात झाली असेल. दिवाळीत लाडू, चकली, करंजी आणि मिठाईवर सर्वजण ताव मारतात.
दिवाळी मधुमेहाची समस्या असणाऱ्या लोकांना मिठाई आणि फराळातील गोड पदार्था खात येत नाही, कारण त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मधुमेहाच्या लोकांना खाता येईल अशी मिठाई बनवूया.
दिवाळीत खास खजूरचे लाडू बनवा. साखरपेक्षा खजूर कमी गोड असतात. तसेच खजूरमध्ये फायबर आणि पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
खजूरचे लाडू बनवण्यासाठी खजूर, ड्रायफ्रूट्स, तूप, दूध आणि वेलची पावडर इत्यादी साहित्य लागते. रेसिपीत खजूरचे प्रमाण ड्रायफ्रूट्सपेक्षा कमी असावे.
खजूरचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम ड्रायफ्रूट्स पॅनमध्ये तूप टाकून चांगले भाजून घ्या. त्यानंतर मिक्सरला पेस्ट बनवा. पेस्ट जास्त पातळ आणि घट्ट होणार नाही याची काळजी घ्या.
दुसरीकडे पॅनमध्ये तूप टाकून त्यात खजूरचे बारीक तुकडे करून चांगले परतून घ्या. त्यानंतर खजूर थंड झाल्यावर मिक्सरला खजूर आणि दूध टाकून पेस्ट बनवा.
आता एका बाऊलमध्ये खजूरची पेस्ट, ड्रायफ्रूट्स पावडर आणि वेलची पूड टाकून मिश्रण एकजीव करा. लाडू नीट वळता यावे म्हणून तुम्ही यात थोडे दूध टाका.
मिश्रण एकजीव झाल्यावर हाताला तूप लावून लाडू वळून घ्या. तयार लाडू हवाबंद डब्यात स्टोर करून ठेवा. १५-२० दिवस लाडू चांगले राहू शकतात. महत्त्वाची गोष्ट मधुमेहाच्या लोकांनी खजूराचे लाडू देखील मर्यादित खावे.