Shreya Maskar
दिवाळीच्या फराळात यंदा साबुदाणा चकलीचाही समावेश करा. ही रेसिपी बनवायला अगदी सिंपल आहे. साबुदाणा चकली बनवण्यासाठी साबुदाणा पाण्यात स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवा.
सकाळी साबुदाणा भिजवल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घ्या. साबुदाणा जास्त जाडसर राहणार नाही याची काळजी घ्या. जेणेकरून चकली बिघडणार नाही.
दुसरीकडे बटाटे उकडून चांगले मॅश करून घ्या. बटाट्यामुळे चकलीचे पीठ चांगले मळले जाईल आणि एक वेगळी चव येईल.
एका बाऊलमध्ये मॅश बटाटा आणि साबुदाणा एकजीव करून घ्या. साबुदाणा पूर्ण बारीक होईल याची काळजी घ्या.
मिश्रणात लाल तिखट, मीठ, जिरे घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या. त्यानंतर यात तेल टाकून पीठ मळून घ्या.
आता चकलीच्या पात्रात तयार पीठ भरून पेपरवर चकली पाडून घ्या. चकली पेपरला जास्त चिकट असेल तर त्यावर कोरडे पीठ भुरभुरवा. म्हणजे चकली सहजरित्या उचलता येईल.
दुसरीकडे तेल गरम करून मंद आचेवर चकली खरपूस तळून घ्या. चकली जळणार नाही याची काळजी घ्या.
जर तुम्ही साबुदाणा रात्री भिजवला नसेल तर सकाळी तो गरम पाण्यात ५ मिनिटे ठेवा आणि मग मिक्सरला लावा. यामुळे साबुदाणा चांगला बारीक होईल आणि चकली देखील चांगली बनेल.