Shreya Maskar
दिवाळीच्या फराळामध्ये पोह्यांचा चिवडा खूप महत्त्वाचा पदार्थ आहे. हा कुरकुरीत आणि चविष्ट लागतो. ज्यामुळे जास्त प्रमाणात खाल्ला जातो.
पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी पातळ पोहे, शेंगदाणे, हरभरा डाळ, काजू, सुकं खोबरं, मोहरी, जिरे, हिंग, साखर, कढीपत्ता, हळद, लाल मिरची, तेल आणि मीठ इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात तुमच्या आवडीचे स्नॅक्स देखील टाकू शकता.
पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी पातळ पोह्यांचा वापर करा. जेणेकरून चिवडा कुरकुरीत होईल. सर्वप्रथम पातळ पोहे स्वच्छ करून घ्या.
पॅनमध्ये थोडे तेल टाकून पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. लक्षात घ्या पोहे जळणार नाही याची काळजी घ्या. कारण ते पातळ आहेत. थोडेजरी पोहे जळले तर चिवडा चांगला होणार नाही.
दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात शेंगदाणे, काजू, हरभरा डाळ, सुकं खोबरं तसेच तुमच्या आवडीचे स्नॅक्स गोल्डन फ्राय करा. म्हणजे ते अजून खुसखुशीत होतील.
तडका बनवण्यासाठी तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग आणि लाल मिरची घालून चांगले तडतडू द्या. फोडणी जळणार नाही याची काळजी घ्या.
नंतर तयार तडक्यात हळद, साखर आणि मीठ घालून मिक्स करा. साखरचे प्रमाण तुमच्या आवडीवर आहे.
आता एका मोठ्या बाऊलमध्ये तळलेले पोहे, बाकी पदार्थ आणि तडका टाकून चिवडा चांगला एकत्र करा. तडका सर्व मिश्रणाला लागेल याची पूर्ण काळजी घ्या. अशाप्रकारे चटपटीत पोह्यांचा चिवडा तयार झाला.