Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Aamhi Saare Khavayye Update : मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. एका व्हिडीओनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Aamhi Saare Khavayye Update
Aamhi Saare KhavayyeSAAM TV
Published On
Summary

मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये'चा मोठा चाहता वर्ग आहे.

'सावळ्याची जणू सावली' मालिकेत संकर्षण कऱ्हाडेची सरप्राइज एन्ट्री झाली आहे.

मालिकेत संकर्षण कऱ्हाडे कुकिंग स्पर्धा घेताना दिसत आहे.

सध्या 'झी मराठी' वाहिनीवर अनेक बदल होताना दिसत आहे. काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. नुकताच 'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शोचा नवीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अशात आता 'झी मराठी'ने शेअर केलेल्या एका प्रोमोनं लक्ष वेधून घेतले आहे.

'झी मराठी'वरचा लोकप्रिय कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' (Aamhi Saare Khavayye) पुन्हा सुरू होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेच्या प्रोमोमध्ये 'आम्ही सारे खवय्ये'ची रंगीत तालीम घेताना 'आम्ही सारे खवय्ये'चा होस्ट संकर्षण कऱ्हाडे पाहायला मिळत आहे. मालिकेतील चारही सूना आपल्या नवऱ्यासोबत कुकिंग करताना दिसत आहेत. या व्हिडीओमुळे 'आम्ही सारे खवय्ये'चा नवीन सीझन सुरू होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तसेच कमेंट्समध्ये नेटकरी 'आम्ही सारे खवय्ये' पुन्हा येत असल्याची चर्चा करताना दिसत आहेत. मात्र अद्याप 'आम्ही सारे खवय्ये' बद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही आहे. 'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील संकर्षण कऱ्हाडेची (Sankarshan Karhade) सरप्राइज एन्ट्री अजून कोणते धमाके घेऊन येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'सावळ्याची जणू सावली' मालिका 7 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते. मालिकेचे आगामी भाग खूपच रंजक होणार आहे. 'आम्ही सारे खवय्ये'चे होस्टिंग अभिनेते प्रशांत दामले आणि संकर्षण कऱ्हाडे यांनी केले आहे. गृहिणींच्या मनावर या शोने राज्य केले आहे. त्यामुळे शो पुन्हा येतोय या गुडन्यूजमुळे महिला वर्गाला खूप आनंद झाल्याचे दिसून येत आहे.

Aamhi Saare Khavayye Update
Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट
Q

'झी मराठी'वरील लोकप्रिय कुकिंग शो कोणता?

A

आम्ही सारे खवय्ये

Q

'आम्ही सारे खवय्ये'चं होस्ट कोण होते?

A

अभिनेते प्रशांत दामले आणि संकर्षण कऱ्हाडे

Q

संकर्षण कऱ्हाडे कोणत्या मालिकेत आला आहे?

A

सावळ्याची जणू सावली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com