बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आपल्या पोस्टमुळे चर्चेत आला आहे.
सलमान खानने रात्री १२ वाजता पोस्ट शेअर केली आहे.
सलमानने पोस्टमध्ये वडिलांनी दिलेल्या सल्ल्याचा उल्लेख केला आहे.
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'बॅटल ऑफ गलवान' (Battle Of Galwan) आणि 'बिग बॉस 19' (Bigg Boss 19) मुळे चांगलाच चर्चेत आहे. चाहते सलमानच्या आगामी प्रोजेक्टसाठी उत्सुक आहेत. अशात सलमान खान त्याच्या पोस्टमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. सलमान खानने इन्स्टाग्रामवर रात्री 12 वाजता एक पोस्ट केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
"वर्तमान हा तुमचा भूतकाळ बनवतो. भूतकाळ तुमचे भविष्य घडवतो. वर्तमान ही एक संधी आहे, त्यामुळे योग्य वागा. सतत चुका करणे ही सवय बनते आणि मग तुमचा तसाच स्वभाव होतो. कोणालाही दोष देऊ नका. तुम्हाला कोणीही तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी करायला भाग पाडू शकत नाही. असे माझा वडील मला नेहमी बोलायचे, जे अगदी बरोबर आहे. काश मी त्यांचे हे बोलणे पूर्वी ऐकले असते. ठीक आहे पण, अजून उशीर झालेला नाही."
'बॅटल ऑफ गलवान' चित्रपटात भारतातील एका युद्धाची कहाणी दाखवण्यात येणार आहे. लडाखच्या गलवान व्हॅली घडलेला हा संघर्ष पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 'बॅटल ऑफ गलवान' ही कहाणी जून 2020 रोजी गलवान खोऱ्यात भारतीय आणि चीनी सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाची आहे. हे युद्ध पारंपरिक शस्त्रांऐवजी दगड, लाकडी काठ्या यांनी लढले गेले. कारण त्या भागात बंदुका वापरण्यावर बंदी होती. या संघर्षात दोन्ही देशांच्या जवानांना आपले प्राण गमवावे लागले.
सलमान खान कोणत्या शोचं होस्टिंग करणार आहे?
बिग बॉस 19
सलमान खानच्या आगामी चित्रपटाचे नाव काय?
बॅटल ऑफ गलवान
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.