ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अशी अनेक औषधे आहेत ज्यांचे दुष्परिणाम लगेच दिसून येत नाहीत, परंतु हळूहळू हृदयाच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात.
तज्ञ्ज्यांच्या मते, काही औषधांचा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. ही औषध कोणती, जाणून घ्या.
तज्ञ्जांच्या मते, दीर्घकाळ NSAIDs म्हणजे पेनकिलर घेतल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो आणि रक्तदाब वाढू शकतो.
सर्दी आणि खोकल्याची औषधे रक्तदाब आणि हृदयाची गती वाढवू शकतात, विशेषतः ज्यांना आधीच हृदयविकाराचा त्रास आहे त्यांच्या हृदयासाठी ही औषध हानिकारक ठरु शकतात.
पीपीआय औषधांचा दीर्घकाळ वापर केल्याने मॅग्नेशियमची पातळी कमी होते, ज्यामुळे हृदयावर परिणाम होऊ शकतो.
काही अँटीबायोटिक्स हृदयाच्या गतीवर परिणाम करतात, ज्यामुळे अनियंत्रित हृदयाचा ठोका म्हणजेच अॅरिथमिया होण्याचा धोका वाढू शकतो.
अनेक स्लिमिंग म्हणजेच वजन कमी करणाऱ्या गोळ्या हृदयाची गती आणि रक्तदाब वाढवतात, ज्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येऊ शकतो.