ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बदलती जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे केस गळण्याची समस्या वाढत आहे.
दैनंदिन जीवनात जाणूनबुजून किंवा नकळतपणे आपण काही चुका करत असतो ज्यामुळे केस गळतात.
काही लोक अंघोळ करून बाथरुममधून बाहेर पडताच केस विंचरायला सुरुवात करतात यामुळे केस खूप गळतात.
ओले केस विंचरल्याने केस लवकर तुटतात, म्हणून केस विंचरण्याआधी केस कोरडे करा.
जंक फूड किंवा फास्ट फूड खाल्ल्याने केसांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. यासाठी तुमच्या आहारात प्रोटीन, आयरन आणिव व्हिटॅमिन्सचा समावेश नक्कीच करा.
दररोज हेअर ड्रायर, स्ट्रेटनर किंवा कर्लर वापरल्यानेही केस जळू शकतात.
जास्त उष्णतेमुळे केस निर्जीव, कोरडे, कमकुवत होतात आणि तुटू लागतात.