Bigg Boss 19 : तान्या मित्तलवर सलमान भडकला; अशनूरच्या डोळ्यात आले पाणी, 'वीकेंड का वार'मध्ये नेमकं घडलं काय?

Salman Khan-Tanya Mittal : 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खानने तान्या मित्तल आणि निलमची चांगली शाळा घेतली आहे. त्यांच्या घरातील वर्तणुकीबद्दल दोघांना सुनावले आहे.
Salman Khan-Tanya Mittal
Bigg Boss 19 SAAM TV
Published On
Summary

तान्या मित्तल आणि निलम अशनूर कौरला 'हत्ती' बोलतात.

सलमान खान 'वीकेंड का वार'ला तान्या मित्तल आणि निलमला फटकारतो.

तर 'वीकेंड का वार'मध्ये अशनूरच्या डोळ्यात पाणी येते.

'बिग बॉस 19' च्या (Bigg Boss 19 ) घरातील भांडणे, राडा काही संपत नाही. रोज एक नवीन गोष्ट पाहायला मिळते. अलिकडेच तान्या मित्तल आणि निलमने अशनूर कौरला बॉडी शेमिंग केले. आता 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खान याबाबत तान्या मित्तल आणि निलमची चांगली शाळा घेतो. त्यांनी केलेल्या चुकीबद्दल त्यांना सुनावतो. तसेच अशनूर कौरही भावुक पाहायला मिळते.

'बिग बॉस 19' मध्ये तान्या मित्तल, नीलम गिरी, कुनिका सदानंद, अमाल मलिक आणि शाहबाज बदेशा यांनी अशनूर कौरबद्दल अश्लील टिप्पण्या केल्या. त्यांनी अशनूर कौरच्या वजनाची खिल्ली उडवली. तान्या मित्तलने तिला 'हत्ती' आणि 'डायनासोर' असेही संबोधले. सलमान खानने या मुद्द्यांवर आपले मौन सोडले आहे. त्याने तान्या मित्तल आणि इतर अनेक स्पर्धकांना फटकारले आहे आणि त्यांच्यावर टीका केली आहे.

'बिग बॉस 19' चा नवीन प्रोमो आला आहे. ज्यात सलमान खान नीलम गिरी आणि तान्या मित्तलला फटकारताना दिसत आहे. सलमान खान नीलम गिरी आणि तान्या मित्तलला अशनूरबद्दल त्यांचे काय मत आहे असे विचारतो. नीलम गिरी म्हणते की, "ती चांगली दिसते", तर तान्या मित्तल म्हणाली, "अशनूर कौर राजकुमारीसारखी दिसते." तथापि, सलमान खानने तिला उघड करण्यात वेळ वाया घालवला नाही. नीलम गिरीला फटकारत सलमान खान म्हणाला, "तुला तुझ्या गप्पांचा खूप अभिमान आहे" तेव्हा सलमान बोलतो की, "तू आता का बोलत नाहीस? तू तर अशनूरला हत्ती, डायनासोर, जाड आणि फुग्यासारखी म्हणाली होतीस..."

अशनूर तान्या मित्तलला बोलते की, "लाज वाटली पाहिजे तान्या..." आज 'वीकेंड का वार' सलमान खान इतर घरातील सदस्यांची देखील शाळा घेणार आहे. तसेच या आठवड्यात 'बिग बॉस 19' च्या घरातून कोण बाहेर जाणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हेल्थ इश्यू असल्यामुळे प्रणित मोरे 'बिग बॉस 19'चे घर सोडू शकतो.

Salman Khan-Tanya Mittal
Aamir Khan GF Gauri : "कहा से आते हो आप लोग..."; पाठलाग करणाऱ्या पापाराझींवर आमिर खानची गर्लफ्रेंड भडकली, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com