सलमान खान दहशतवादी म्हणून घोषित, पाकिस्तान सरकारचा कारनामा; कारण काय? VIDEO

Salman Khan Terrorist Declaration Pakistan: अभिनेता सलमान खानला पाकिस्तान सरकारने दहशतवादी घोषित केले आहे. बलुचिस्तानबाबतच्या वक्तव्यांमुळे त्याच्यावर फोर्थ शेड्यूलमध्ये समावेश करण्यात आला असून, त्याच्यावर प्रवास निर्बंध आणि मालमत्ता जप्तीची कारवाई होणार आहे.

अभिनेता सलमान खानला पाकिस्तान सरकारने दहशतवादी घोषित केले आहे. यामागचे कारण म्हणजे सलमानने सौदी अरबियातील एका कार्यक्रमात बलुचिस्तानबद्दल वक्तव्य केले होते. या कार्यक्रमात सलमानने पाकिस्तान आणि बलुचिस्तान यांचा वेगवेगळा उल्लेख केला. यामुळे पाकिस्तान सरकारला पोटशूळ झाला आहे. या व्यक्तव्यानंतर पाकिस्तान सरकार नाराज झाले असून शाहबाज सरकारने एका अधिकृत अधिसूचना जारी करत सलमानला थेट दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. दहशतवादविरोधी अधिनियमांतर्गत पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे. तसेच सलमानचं नाव फोर्थ शेड्यूलमध्ये टाकले आहे.

फोर्थ शेड्यूल यादी म्हणजे काय?

पाकिस्तानच्या 1997 च्या दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत फोर्थ शेड्यूलमध्ये कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींची यादी आहे. या यादीत असलेल्यांना पाकिस्तानमध्ये प्रवास करण्यास निर्बंध लादला जातो. त्यांची पाकिस्तानमधील मालमत्ता ही जमा केली जाते आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com