'बालिका वधू' फेम अभिनेत्री अविका गौर मिलिंद चंदवानीसोबत लग्न करणार आहे.
नॅशनल TVवर अविकाचा लग्न सोहळा पार पडणार आहे.
अविका सप्टेंबर महिन्यांच्या शेवटी लग्न बंधनात अडकणार आहे.
लोकप्रिय टिव्ही अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. 'बालिका वधू' फेम अविका गौरने लग्नाची तारीख घोषित केली आहे. सध्या अविका गौर आणि तिचा होणारा नवरा 'पती,पत्नी और पंगा' मध्ये दिसत आहे. अविका गौरच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव मिलिंद चंदवानी आहे. जून महिन्यात अविकाने सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. तिने साखपुड्याचे फोटो शेअर केले होते.
अविका गौर (Avika Gor) आणि मिलिंद चंदवानी (Milind Chandwani) यांनी 'पती,पत्नी और पंगा' च्या सेटवर (Pati Patni Aur Panga) आपल्या लग्नाची घोषणा केली. तसेच सर्वांना आमंत्रण देखील दिले. अविका गौर आणि मिलिंद चंदवानी 'पती,पत्नी और पंगा' च्या सेटवर लग्न करणार आहे. याचे थेट प्रसारण प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. अविका गौर आणि मिलिंद चंदवानी 30 सप्टेंबर 2025 रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत.
अविका गौरला 'बालिका वधू' या मालिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली. मालिकेत अविकाने'आनंदी'च्या भूमिका साकारली होती. अविका गौर मिलिंद चंदवानीला अनेक वर्ष डेट करत होती. सध्या अविका गौर आणि मिलिंद चंदवानीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच ही दोघे नुकतेच सिद्धिविनायक मंदिरात देवाच्या दर्शनाला गेले होते.
अविका गौरचा होणारा नवरा मिलिंद चंदवानी 'कॅम्प डायरीज' या एनजीओचा बेंगळुरू येथील संस्थापक आहे. त्याने 'एमटीव्ही रोडीज रिअल हिरोज'मध्येही सहभाग घेतला होता. मीडिया रिपोर्टनुसार, अविका गौर आणि मिलिंद चंदवानी गेल्या 5 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.