Avika Gor Engagement : 'बालिका वधू' फेम अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा, होणारा नवरा कोण? पाहा PHOTOS

Avika Gor - Milind Chandwani Engagement Photos : 'बालिका वधू' फेम अभिनेत्री अविका गौरचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Avika Gor - Milind Chandwani Engagement Photos
Avika Gor EngagementSAAM TV
Published On

लोकप्रिय टिव्ही अभिनेत्री अविका गौर कायम तिच्या कामामुळे चर्चेत असते. आजवर तिने अनेक मालिका आणि शोमध्ये काम केले आहे. तिची 'बालिका वधू' ही मालिका खूप सुपरहिट झाली. या मालिकेत अविका गौर (Avika Gor) 'आनंदी'च्या भूमिक दिसली. 'बालिका वधू'ने अविकाला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. आता मात्र अविका आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगली चर्चेत आली आहे. छोट्याशा आनंदीने खऱ्या आयुष्यात आपला जोडीदार निवडला आहे.

अभिनेत्री अविका गौर नुकताच गुपचूप साखरपुडा (Engagement ) उरकला आहे. आपल्या साखरपुड्याची आनंदाची बातमी अविकाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून चाहत्यांना दिली आहे. अविका गौरने बॉयफ्रेंड मिलिंद चंदवानीसोबत (Milind Chandwani) साखरपुडा केला आहे. हे दोघे बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. अविकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघेही खूप आनंदी आणि पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे. अविकाने बेबी पिंक रंगाची साडी नेसली आहे. तर मिलिंदने तिच्या साडीला मॅचिंग शेरवानी परिधान केली आहे. अविकाने फोटोंना एक हटके कॅप्शन दिलं आहे.

अविका गौर पोस्ट

"त्याने लग्नासाठी विचारले...मी हसले, मी रडले..आणि माझ्या आयुष्यातील हा सर्वात सिंपल होकार...

मी पूर्णपणे फिल्मी आहे... पार्श्वसंगीत, स्लो-मो स्वप्ने आणि सर्व काही...

तो लॉजिकल , शांत आहे ...

मी ˈमॅनिफेस्ट करते आणि तो ते सत्यात आणतो...

म्हणून जेव्हा त्याने लग्नासाठी विचारले, तेव्हा माझ्यातील हिरोईन जागी झाली...

हात हवेत असल्यासारखे वाटले, माझ्या डोळ्यात अश्रू आणि मनात कोणताही विचार उरला नाही...कारण खरे प्रेम? ते नेहमीच परिपूर्ण असू शकत नाही.पण, ते जादुई आहे..."

अविकाच्या पोस्टवर तिच्या होणाऱ्या नवऱ्याने मिलिंदने खूप खास कमेंट केली. त्याने लिहिलं की, "कथानकाचा ट्विस्ट- खरे पार्श्वसंगीत म्हणजे, माझ्या हृदयाचे ठोके २०० बीपीएमवर चालत होते. तू हो म्हणालीस आणि अचानक प्रत्येक फिल्मी ओळ अर्थपूर्ण वाटू लागली...तू ड्रामा तर मी दिग्दर्शक आपण दोघे मिळून सर्वोत्तम चित्रपट बनवू."

सध्या अविका आणि मिलिंदवर चाहते आणि कलाकरांकडूनशुभेच्छांचा, प्रेमाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता अविकाचे चाहते तिच्या आणि मिलिंदच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

मिलिंद चंदवानी कोण?

अविका गौरचा होणारा नवरा मिलिंद चंदवानी 'कॅम्प डायरीज' या एनजीओचा बेंगळुरू येथील संस्थापक आहे. त्याने 'एमटीव्ही रोडीज रिअल हिरोज'मध्येही सहभाग घेतला होता. मीडिया रिपोर्टनुसार, अविका गौर आणि मिलिंद चंदवानी गेल्या 5 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

Avika Gor - Milind Chandwani Engagement Photos
Housefull 5 Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर अक्षयच्या 'हाऊसफुल 5'ची जादू फेल, ६व्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com