
पाच दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या एका तरुणाचा आपल्याच दुकानात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हा तरुण नेहमीप्रमाणे त्याच्या कापड्यांच्या दुकानात बसून काम करत होता. अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो जागीच मरण पावला. ही संपूर्ण घटना दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. ही घटना गुजरातच्या सुरतमध्ये घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय ऋषभ गांधी या तरुणाचा मृत्यू त्याच्याच दुकानात झाला. नेहमीप्रमाणे ऋषभ त्याच्या मेहुण्यांसह आणि मित्रांशी दुकानात बोलत बसला होता. बोलता-बोलता त्याला तहान लागली, त्याने समोर ठेवलेली पाण्याची बाटली उचलली. बाटलीचे झाकण उघडून पाणी पिण्याचा प्रयत्न केला. हात-पाय हलत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. तो ज्या ठिकाणी बसला होता, तेथेच खुर्चीवर लोळू लागला.
दुकानात बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाला. ऋषभ जमिनीवर लोळू लागल्याने मित्रांनी आणि मेहुण्यांनी त्याला सीपीआर देण्यास सुरुवात केली. हे प्रयत्न सुरु असताना ऋषभने प्रतिसाद देणे बंद केले. तब्येत बिघडत असल्याने ऋषभला खुर्चीवर बसवून लिफ्टमधून पार्किंगमध्ये आणण्यात आले. जवळच्या रुग्णालयात त्याला दाखल केले. पण तेव्हा डॉक्टरांनी ऋषभला मृत घोषित केले.
ऋषभच्या मृत्यूमागील कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे म्हटले जात आहे. ऋषभच्या मृत्यूबाबतची माहिती मिळतात त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला. ऋषभचा मृतदेह सुरतहून राजस्थानमधील त्याच्या मूळ गावी अंत्यसंस्कारासाठी नेण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. पाच दिवसांपूर्वी ऋषभचा साखरपुडा झाला होता. आता त्याच्या मृत्यूच्या बातमीने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.