आदित्य ठाकरे पावसाळ्यात जेलमध्ये जाऊ शकतात; नितेश राणेंचं खळबळजनक विधान, राज-उद्धव ठाकरेंच्या युतीचीही खिल्ली

Nitesh Rane Criticizes Uddhav And Aaditya Thackeray : भाजप नेते आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंच्या अटकेबाबत विधान करून खळबळ उडवून दिली आहे. धाराशिवमधील तुळजापूरमध्ये ते बोलत होते.
Uddhav Thackeray vs Nitesh Rane Aaditya Thackeray
Uddhav Thackeray vs Nitesh Rane Aaditya Thackeraysaam tv
Published On

बालाजी सुरवसे, धाराशिव | साम टीव्ही

राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारं विधान केलं आहे. उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करू शकतो, असं सांगून राणे यांनी आदित्य ठाकरेंच्या अटकेबाबतचे संकेत दिले आहेत. डिनो मोरिया प्रकरणावरून राणेंनी हा दावा केला आहे. ते तुळजापुरात बोलत होते.

नितेश राणे यांनी डिनो मोरिया प्रकरणावरून ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केलं आहे. उद्धव ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात तुरुंगाची वारी करू शकतो. डिनो मोरिया प्रकरणावरून लक्ष्य हटवण्यासाठीच ठाकरेंच्या एकत्रि‍करणाची चर्चा सुरू असल्याचंही राणे म्हणाले.

डिनो मोरिया प्रकरणावरून नितेश राणेंनी ठाकरे कुटुंबाला टार्गेट केले आहे. उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करू शकतो, असं सांगतानाच नितेश राणेंनी आदित्य ठाकरे यांच्या अटकेचे संकेत दिले आहेत. डिनो मोरिया प्रकरणात होणाऱ्या कारवाया आणि प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठीच एकत्रीकरणाची चर्चा सुरू असल्याचेही राणे म्हणाले.

डिनो मोरिया प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा मुलगा जेलची वारी करू शकतो अशी माहिती असल्याचा दावा राणेंनी केला. मोरिया हा कोणासोबत बसायचा? कोणासोबत भावनिक संबंध आहेत हे सगळ्यांना माहीत असल्याचेही ते म्हणाले.

राज-उद्धव ठाकरे एकत्रिकरणाचीही खिल्ली

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे बंधू एकत्र येण्याची चर्चा सध्या सुरू आहे. भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी या मुद्द्यावरून खिल्ली उडवली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी आम्ही खूप घाबरलो आहोत. आम्हाला घाम फुटला आहे. एकाचे २० आमदार, तर एकाचे शून्य आणि आमचे १३२ आहेत. त्यामुळे आम्ही खूप घाबरलोय, असं म्हणत राणेंनी ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याच्या चर्चेची खिल्ली उडवली.

Uddhav Thackeray vs Nitesh Rane Aaditya Thackeray
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना मोठा झटका, एकमेव नगरसेवक फोडला

आम्हाला झोप लागत नाही, एकाकडे वीस आमदार आणि एकाकडे शून्य एवढी यांची शक्ती आहे. या शक्तीला आम्ही घाबरलो आहोत. आम्हाला घाम फुटला आहे, असे राणे म्हणाले. हिंदुत्व सोडल्यामुळेच ठाकरे ब्रँड बुडाल्याचा टोलाही नितेश राणेंनी लगावला.

Uddhav Thackeray vs Nitesh Rane Aaditya Thackeray
Sharad Pawar: राज ठाकरेंवर पवारांची थेट टीका; म्हणाले, सभांना गर्दी असते, पण मतं मिळत नाहीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com