Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना मोठा झटका, एकमेव नगरसेवक फोडला

Raj Thackeray faces blow : मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून राज ठाकरे यांना मोठा झटका दिला आहे. या पक्षप्रवेशामुळे मनसेला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे.
Sanjay Turde, MNS’s only corporator, joins Eknath Shinde’s Shiv Sena in Thane ahead of civic elections.
Sanjay Turde, MNS’s only corporator, joins Eknath Shinde’s Shiv Sena in Thane ahead of civic elections.Saam TV News
Published On

मनपा निवडणुकीच्या आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंना मुंबईमध्ये मोठा धक्का दिला आहे. मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय तुर्डे आज ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. राज ठाकरेंच्या मनसेची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीची चर्चा सुरू असतानाच सलग दुसऱ्या दिवशी त्यांना हादरा बसला आहे. काल अंधेरीमधील कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. आज एकमेव नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत जात आहे. या प्रवेशामुळे आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत.

२०१७ मध्ये मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या, त्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते. त्यामधील सहा नगरसेवकांनी काही दिवसांताच राज ठाकरेंची सात सोडत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. संजय तुर्डे हे एकमेव नगरसेवक राज ठाकरेंसोबत होते. पण आता निवडणुकीच्या आधीच तुर्डे यांनी राज ठाकरेंची साथ सोडत शिवधनुष्य उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज त्यांचा ठाण्यामध्ये प्रवेश प्रवेश होणार आहे.

Sanjay Turde, MNS’s only corporator, joins Eknath Shinde’s Shiv Sena in Thane ahead of civic elections.
इकडे युतीची चर्चा, तिकडे शिलेदार फोडला, मनसे नेत्याचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश!

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णायानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. चार महिन्याच्या आता राज्यातील मनपा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश कोर्टाने दिले. त्यामुळे राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. अनेक राजकीय नेत्यांचे पक्षांतर होत असल्याचे दिसतेय. मनसेचे नेते संजय तुर्डे हेही निवडणुकीच्या आधी शिंदेंसोबत जाणार आहेत. मुंबईमध्ये निवडणुकीआधी हा ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय.

Sanjay Turde, MNS’s only corporator, joins Eknath Shinde’s Shiv Sena in Thane ahead of civic elections.
Pune : शरद पवारांचा राज ठाकरेंना धक्का, १०० कार्यकर्त्यांचा मनसेला जय महाराष्ट्र!

श्रीरामपूरचे माजी आमदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार -

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते भानुदास मुरकुटे हे आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे येथे हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार आहे. माजी आमदार मुरकुटे आपल्या कार्यकर्त्यांसह ठाण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुरकुटे यांनी यापूर्वी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,BRS पक्षात काम केले आहे. आता त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने आगामी काळात श्रीरामपूरमधील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

Sanjay Turde, MNS’s only corporator, joins Eknath Shinde’s Shiv Sena in Thane ahead of civic elections.
Maharashtra Politics : शिंदेंच्या पाठीत खंजीर, राष्ट्रवादीपुढे कधीच झुकणार नाही, शिवसेना आमदाराची टोकाची भूमिका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com