इकडे युतीची चर्चा, तिकडे शिलेदार फोडला, मनसे नेत्याचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश!

MNS Shiv Sena Alliance News मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू असतानाच अंधेरीतील मनसेचे माजी पदाधिकारी वैभव दळवी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर अनिल परब यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
MNS Shiv Sena Alliance News
MNS Shiv Sena Alliance NewsSaam TV News
Published On

Why did Vaibhav Dalvi quit MNS and join Shiv Sena? : ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये एकीकडे युतीची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे मात्र राज ठाकरेंच्या शिलेदारांनी शिवबंधन बांधले आहे. मातोश्रीवर झालेल्या या पक्षप्रवेशाची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. अंधेरीमधील मनसेचे पदाधिकारी वैभव दळवी यांनी आज त्यांच्या कार्यकर्त्यांसह ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित त्यांनी शिवबंधन बांधळं. त्याशिवाय शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या सुजाता शिंगाडे या पुन्हा स्वगृही म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत परतल्या आहेत. दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेत गेलेले वैभव दळवी हे आमचे कार्यकर्ते नाहीत. दहा वर्षांपूर्वी त्यांची हकालपट्टी केली होती, असं स्पष्टीकरण अविनाश देशपांडे दिलेय.

वैभव दळवी हे मनसेचे अंधेरी पूर्वचे पदाधिकारी होते, त्यांनी काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची इच्छा दर्शवली होती. त्यानुसार शुक्रवारी त्यांनी समर्थकांसह शिवबंधन बांधून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी अनिल परब आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते. मुंबई महापालिका निवडणूक लवकरच जाहीर होऊ शकते, या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेने संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी पावले उचलली आहेत. वैभव दळवींचा पक्षप्रवेश हा त्याचाच एक भाग मानला जातो.

MNS Shiv Sena Alliance News
Shiv Sena-MNS Alliance : राज-उद्धव ठाकरेंची युती नेमकी अडली कुठं? मनसेच्या नेत्यांनी कारणच सांगून टाकलं

संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेत युतीबाबत उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव आला तर युती शक्य होईल, असे म्हटले. पण त्यानंतर पुढच्याच काही मिनिटात मनसेचे वैभव दळवी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. दळवी यांच्यासोबत अंधेरीमधील अनेक मनसे कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. दळवी यांचं अंधेरीमध्ये मोठं राजकीय वजन आहे, त्यामुळे मनपा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला तगडा फायदा होईल, असे म्हटले जातेय.

मनसेच्या युतीवर काय म्हणाले ?

महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे काय आहे, तेच होईल, माझ्या शिवसैनिकांच्या मनात आणि मनसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही आम्ही डायरेक्टली बातमीच देऊ असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते मातोश्रीवर पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांना राज ठाकरेंसोबतच्या युतीवर प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. युतीचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांच्याकडूनच यायला हवा, अशी भूमिका मनसेच्या नेत्यांनी मांडली होती. राऊतांच्या वक्तव्यानंतर संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंकडून युतीचा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com