Yavatmal: हॉर्न वाजवल्यानं सटकली, एसटी बसमध्ये घुसून राडा; ड्रायव्हर-कंडक्टरला चौघांची मारहाण, व्हिडिओ व्हायरल

ST bus driver and conductor assaulted : यवतमाळवरून अमरावतीकडे जाणाऱ्या एसटी बसच्या चालक आणि वाहकाला चार ते पाच तरुणांनी मिळून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Yavtmal crime
Yavtmal crimeSaam
Published On

यवतमाळवरून अमरावतीकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये चार ते पाच तरुणांच्या टोळक्याने राडा घालून एसटी चालक आणि वाहकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. बसचालकाने टाटा मॅजिकला साईड देण्यासाठी हॉर्न वाजवला होता. मात्र, यावरून संतप्त झालेल्या टोळक्याने बसमध्ये चढून चालक-वाहकाला बेदम मारहाण केली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ४ जून रोजी वटफळी दोडकी येथील हनुमान मंदिराजवळ, नेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. प्राथमिक माहितीनुसार, एसटी बसचालकाने टाटा मॅजिकला साईड देण्यास सांगण्यासाठी हॉर्न वाजवला. यावरून संतप्त झालेल्या तरुणांनी बसमध्ये घुसून राडा घातला.४ ते ५ जणांनी मिळून एसटी चालक आणि वाहकावर हल्ला चढवला.

Yavtmal crime
Kolhapur: ज्योतिबाच्या डोंगरावर नेलं अन् बायकोला संपवलं, चारित्र्याच्या संशयावरून नवऱ्याचं भयानक कृत्य

या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणानंतर नेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीनुसार, पोलिसांनी जग्गू मेश्राम, तेजस राठोड, हर्षल बनकर आणि शुभम जगताप या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, दरोडा टाकणे यासह गंभीर स्वरूपाचे कलम लावण्यात आले आहेत.

Yavtmal crime
Beed Crime: 'आम्हाला मुलगाच हवा होता', सासरच्या जाचाला कंटाळली, घराबाहेर काढलं, बीडच्या लेकीचा पुण्यात छळ

मारहाणीत वाहकाच्या हातातील १०,३६० रुपयांची रक्कमही कुणीतरी चोरून नेल्याचे समोर आले आहे. या घटनेची सखोल चौकशी सुरू असून, आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच १०,३६० रूपये नेमकं कुणी लंपास केला, याचाही तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com