Beed Crime: 'आम्हाला मुलगाच हवा होता', सासरच्या जाचाला कंटाळली, घराबाहेर काढलं, बीडच्या लेकीचा पुण्यात छळ

Domestic Violence Crime News: बीडच्या लेकीचा पुण्यात छळ झाल्याची माहिती समोर आली आहे. आधी तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला नंतर मारहाणही करत घराबाहेर काढलं. मुलगी झाली म्हणून उपाशी ठेवलं.
Crime News
Crime News Saam Tv
Published On

हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर राज्यात संतापाची लाट उसळली. तरीही सुनांच्या छळाच्या घटना वारंवार घडत असल्याचं चित्र आहे. अशातच बीडच्या लेकीचा पुण्यात छळ झाल्याची माहिती समोर आली आहे. आधी तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला नंतर मारहाण करत घराबाहेर काढलं. मुलगी झाली म्हणून सासरच्या मंडळींनी पुन्हा एकदा त्रास देण्यास सुरूवात केली. याच त्रासाला कंटाळून तिने पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

१ जून २०२१ रोजी बीडच्या सुनीताचं पुण्यातील तरूणासोबत लग्न झालं होतं. मानपान संसार उपयोगी साहित्य देऊन तिला नांदायला पाठवलं होतं. सहा महिन्यानंतर तिचा सासरच्या मंडळींकडून छळ करण्यास सुरूवात झाली. काही दिवस तिनं हे सगळं सहन केलं. मात्र, ४ फेब्रुवारी २०२२ रोजी तिने याबद्दल आपल्या आई वडिलांना माहिती दिली. त्यानंतर माहेरच्या मंडळींनी तिला माहेरी नेलं. बैठक घेत त्यांनी भांडण मिटवलं आणि सुनेला सासरी नेलं.

Crime News
Elon Musk: 'दोस्त दोस्त न रहा', एलोन मस्कचं डोनाल्ड ट्रम्पला चॅलेंज, थेट नवीन पार्टी काढली

चार महिन्यानंतर ती गर्भवती राहिली. मात्र, सासरच्या मंडळींकडून छळ सुरूच होता. २५ जानेवारी २०२४ रोजी तिने मुलीला जन्म दिला. सासरचे मंडळी नाराज झाले. त्यांनी 'तुला मुलगी कशी झाली, आम्हाला मुलगा हवा होता', असं म्हणत त्रास देण्यास सुरूवात केली.

Crime News
Beed Crime: '२ लाख हवेत', सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी छळ; विवाहितेनं गळफास घेऊन आयुष्य संपवलं

तिला यादरम्यान उपाशी ठेवण्यात आलं. 'मुलगी झाली, आता तिचं पालनपोषण आणि शिक्षणाचा खर्च कोण करणार?' असा प्रश्न विचारत तिला मानसिक त्रास देण्यास सुरूवात केली. नंतर घराबाहेर काढलं. माहेरी आल्यानंतर तिने पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com