Elon Musk: 'दोस्त दोस्त न रहा', एलोन मस्कचं डोनाल्ड ट्रम्पला चॅलेंज, थेट नवीन पार्टी काढली

Elon Musk v/s Donald Trump: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे जिगरी मित्र तसेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक एलॉन मस्क यांच्यात जबरदस्त खडाजंगी पाहायला मिळत आहे. दोघेही एकमेकांना भिडले आहेत.
 Elon Musk
Elon MuskSaam
Published On

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे एकेकाळचे निकटवर्तीय तसेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले एलॉन मस्क यांच्यात सध्या जबरदस्त संघर्ष पाहायला मिळत आहे. दोघांनीही सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एकमेकांवर थेट आरोप करत त्यांच्या वैराला उघडपणे वाचा फोडली. मस्क यांनी केलेल्या आरोपानंतर त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन करून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. तसेच त्यांनी आपल्या एक्स पोस्टवर एक पब्लिक पोल शेअर केला आहे. त्यांनी या पोलमधून राजकीय पक्ष स्थापना करण्यासाठी जनतेकडून त्यांनी कौल घेतला आहे.

एलॉन मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर शब्दांनी जोरदार हल्ला चढवत त्यांच्यावर सेक्स स्कँडलमध्ये सहभागी असल्याचा गंभीर आरोप केला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी ट्रम्प यांचे सत्तेतील वर्चस्व संपवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, स्वतःचा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याचा इशाराही दिला आहे. मस्क यांनी आपल्या 'एक्स' हँडलवर यासंदर्भात पोल देखील शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी नव्या पक्षाच्या स्थापनेबाबत जनतेचा कौल मागितला.

 Elon Musk
Shocking: लोकल पकडायला धावला अन् गटारीत पडला, कुर्ला स्टेशनवरील भयंकर व्हिडिओ

या पोलचे निकाल जाहीर करताना मस्क म्हणाले, “८० टक्के लोकांनी पक्ष स्थापनेला पाठिंबा दर्शवला आहे. हेच आता घडले पाहिजे.” त्यांनी ‘द अमेरिका पार्टी’ या नावाने नवीन पक्षाची घोषणा करत पुढील राजकीय पाऊल उचलले आहे. त्यांच्या या घोषणेला सोशल मिडियावर मोठा प्रतिसाद मिळाल्याचेही समोर आले आहे.

मस्क यांनी एका आठवड्यापूर्वी ट्रम्प सरकारमधून आपला काढता पाय घेतला. त्यांनी राजीनामा दिला. तसेच त्यांनी अमेरिकन सरकारच्या बजेटवर टीका केली आहे. हे बजेट सामान्य जनतेला कर्जाच्या खाईत लोटणारे असल्याचा आरोप करत, त्यावर आपले मत विचारलेही गेले नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 Elon Musk
Beed Crime: '२ लाख हवेत', सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी छळ; विवाहितेनं गळफास घेऊन आयुष्य संपवलं

मस्क यांनी असा दावाही केला आहे की, “जर मी ट्रम्प यांना मदत केली नसती, तर ते निश्चितच हरले असते.” त्यांनी ट्रम्प यांचे नाव ‘जेफ्री एपस्टाईन फाईल्स’ या अमेरिकेतील सर्वात मोठ्या सेक्स स्कँडलमध्ये असल्याचेही म्हटले आहे. त्यांच्या या आरोपांमुळे अमेरिकेसह अनेक देशांमध्ये खळबळ उडाली आहे.

अमेरिकेच्या संविधानानुसार, कोणताही अध्यक्ष जास्तीत जास्त दोन कार्यकाळ म्हणजेच ८ वर्षांपर्यंतच सत्तेवर राहू शकतो. याअंतर्गत बराक ओबामा, जॉर्ज बुश यांच्यासारख्या नेत्यांनीही आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर अध्यक्षपद सोडले होते. त्यामुळे तिसऱ्यांदा कोणालाही अध्यक्ष होता येत नाही. अमेरिकेतील पुढील राष्ट्रपती निवडणूक २०२८ मध्ये होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com