Maratha Community : 'डीजे, हुंडा बंदी, प्री-वेडिंग शूट नाही अन्...'; मराठा समाजाने लग्नासाठी ठरवली आचारसंहिता, वाचा संपूर्ण नियम

Maratha Community Latest News : मराठा समाजाने लग्नासाठी आचारसंहिता ठरवली आहे. या आचारसंहितेत अनेक नियम आहेत.
Maratha Community News
Maratha Community Saam tv
Published On

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

नांदेड : वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. लग्नातील होणारा बडेजाव आणि खर्च टाळण्यासाठी थेट आचारसंहिता ठरवली आहे. लग्न समारंभाची आचारसंहिता ठरवण्यासाठी नांदेडमध्ये मराठा समाजाची बैठक पार पडली आहे. जिल्हास्तरावर ही सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे.

Maratha Community News
Mumbai Local Train Accident : लोकल प्रवाशांच्या गर्दीचा धडकी भरवणारा व्हिडिओ; मनसे नेत्याने मांडलं वास्तव, पाहा VIDEO

सुकाणू समितीच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या माध्यमातून ही जनजागृती केली जाणार आहे. लग्न समारंभाच्या आचारसंहितेसाठी मराठा समाजाने विशेष बैठकमध्ये नांदेडमध्ये बैठक आयोजित केली होती. साध्या पद्धतीने लग्न करा, अवास्तव खर्च टाळा, असा सूर मराठा समाजाच्या या बैठकीत निघाला.

मराठा समाजाने अचानक मोठा निर्णय का घेतला?

पुण्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण समोर आल्यानंतर लग्नात होणारा बडेजाव आणि खर्च चर्चेत आला. त्या अनुषंगाने मराठा समाजाची अहिल्यानगर येथे बैठक पार पडली होती. त्यात लग्न समारंभात काही आचारसंहिता ठरवण्यात आली होती. त्यानंतर आज मराठा समाजाची नांदेड येथे बैठक पार पडली. या बैठकीला वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Maratha Community News
Pune Shocking : पुण्यात आणखी एक 'वैष्णवी'; हुंड्यासाठी जीवघेणा छळ, २३ वर्षीय विविहितेने दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत संपवलं आयुष्य

लग्नात होणारा अवास्तव खर्च टाळण्यात यावा, डीजेवर बंदी घालण्यात यावी, प्री-वेडिंग शूट करू नये, हुंडा देऊ नये, तसेच घेऊ नये, हळद समारंभाचा कार्यक्रम छोटेखानी करावा, या सर्व विविध विषयावर चर्चा करण्यात आली. सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन एक सुकाणू समिती निर्माण करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून गाव पातळीवर प्रबोधन केले जाणार आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त सामूहिक विवाह सोहळ्यावर भर देण्यात यावा, असाही सूर या बैठकीतून निघाला आहे.

Maratha Community News
Marathi Gujarati clash : आपुल्याच घरात हाल सोसतो मराठी माणूस; घाटकोपरमध्ये गुजराती कुटुंबाकडून गायकवाड कुटुंबाला मारहाण, VIDEO आला समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com