Vaishnavi Hagawane: हगवणेंचा आणखी एक पराक्रम, JSB जप्त करण्यासाठी आपले कर्मचारी पाठवले, बँक मॅनेजर म्हणाले..

Hagawane Family JCB Seized Case: प्रशांत येळवंडे यांच्याकडून विकत घेतलेल्या जेसीबी मशीनचा बेकायदेशीर ताबा घेण्यासाठी हगवणे कुटुंबीयांनी चक्क बनावट बँक अधिकारी पाठवले, हे आता पोलीस तपासात उघड झालंय.
Vaishnavi Hagawane Family
Vaishnavi Hagawane FamilySaam
Published On

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर हगवणे कुटुंबाचे नवनवीन प्रताप समोर येत आहेत. अशातच जेसीबी प्रकरणात हगवणे माय लेकाचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण पोलीस तपासात शशांक आणि लता हगवणे यांनी जेसीबी मशीनची बेकायदेशीर ताबा घेण्यासाठी तोतया बँक अधिकारी पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी इंडसइंड बँकेतील मॅनेजरनेही धक्कदायक माहिती दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी तपास करीत ३ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

प्रशांत येळवंडे यांनी लता आणि शशांक हगवणे यांच्याकडून २४ लाख रुपयांना जेसीबी मशीन खरेदी केली होती. मात्र व्यवहार पूर्ण झाल्यानंतरही, हगवणे कुटुंबीयांनी बनावट रिकव्हरी कारवाईचा बनाव करत, मशीन बळजबरीने परत घेतलं. या प्रकरणी हगवणे कुटुंबाने इंडसइंड बँकेच्या नावाखाली ३ तोतया कर्मचारी पाठवले. तसेच येळवंडेकडून जेसीबी मशीन जप्त केली.

Vaishnavi Hagawane Family
Gold Rate: चांदीला आज चकाकी, सोन्याच्या दरात वाढ झाली की घसरण? जाणून घ्या आजचे दर

या प्रकरणात प्रशांत येळवंडे यांच्या तक्रारीवरून लता हगवणे आणि शशांक हगवणे यांना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी आधीच अटक केली आहे. पोलिसांनी अधिक तपास करून योगेश राजेंद्र रासकर (वय 25), गणेश रमेश पोतले (वय 30) आणि वैभव मोहन पिंगळे (वय 27) या तीन तोतया बँक कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.

इंडसइंड बँकेचा खुलासा

या प्रकरणात इंडसइंड बँकेच्या लीगल मॅनेजरने स्पष्ट केलं की, बँकेने कुठल्याही रिकव्हरी एजन्सीला जेसीबी जप्त करण्याचे आदेश दिले नव्हते. त्यामुळे हा सर्व प्रकार फसवणुकीचा होता हे स्पष्ट झालं आहे.

Vaishnavi Hagawane Family
Pune Aundh: 'बायकोवरून लिंबू फिरव मगच आमदार होशील' हगवणेपेक्षा महाभंयकर गायकवाड; सुनेचा अघोरी छळ अन्..

गोडाऊन मालकांची कबुली

जेसीबी नेहमी ठेवण्यात येणाऱ्या गोडाऊनचे मालक रणजित आणि भूषण खांडेभराड यांनी देखील तपासात सांगितलं की, येळवंडे यांच्याकडून जप्त झालेला जेसीबी कधीच त्यांच्या गोडाऊनमध्ये आला नव्हता. त्यामुळे जेसीबी जप्ती हा हगवणे मायलेकांच्या कटाचा भाग असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com