Malaika Arora-Arjun Kapoor Viral Video
Malaika Arora-Arjun KapoorSAAM TV

Malaika Arora-Arjun Kapoor : ब्रेकअपनंतर अर्जुन-मलायका पुन्हा एकत्र; पाहताच मारली मिठी, 'तो' VIDEO व्हायरल

Malaika Arora-Arjun Kapoor Viral Video : सध्या सोशल मीडियावर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात दोघे मिठी मारताना दिसत आहे.
Published on
Summary

2024मध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचा ब्रेकअप झाला.

ब्रेकअपनंतर मलायका आणि अर्जुन नुकतेच एका कार्यक्रमात भेटले.

मलायका आणि अर्जुनचा मिठी मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) कायम तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अनेक वर्ष अर्जुन कपूरला डेट करत होती. मात्र 2024 मध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचा (Arjun Kapoor) ब्रेकअप झाला. ब्रेकअपनंतर आता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा समोरासमोर आले आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नुकतेच 'होमबाउंड'(Homebound) चित्रपटाचे स्क्रीनिंग पार पडले. या कार्यक्रमाला मलायका आणि अर्जुन आले होते. तेव्हा अचानक दोघेही एकमेकांच्या समोर येतात. तेव्हा दोघेही थोडे गोंधळतात. पण एकमेकांना मिठी मारतात. त्यानंतर अर्जुन मलायकाशी बोलण्याचा प्रयत्न करतो. मात्र मलायका थोडे बोलून त्याला टाळते आणि तेथून निघून जाते. अर्जुन आणि मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर 2018 पासून एकत्र होते. त्यांनी तब्बल सहा वर्ष एकमेकांना डेट केले. 2024 मध्ये दिवाळीत एका कार्यक्रमात अर्जुन कपूर "मी आता सिंगल आहे" असे म्हणून मलायकासोबतच्या ब्रेकअपवर शिक्कामोर्तब केला होता. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरला त्यांच्या वयातील अंतरामुळे अनेक वेळा ट्रोल करण्यात आले होते. अर्जुन कपूर हा मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे.

मलायका अरोराचे 1998 साली अरबाज खानसोबत लग्न झाले होते. त्यानंतर 2017 साली त्यांनी घटस्फोट घेतला. लग्नाच्या 19 वर्षानंतर मलायका आणि अरबाज विभक्त झाले. मलायकाचा अरहान खान हा मुलगा आहे. अरहान आणि मलायका अनेक वेळा डिनर डेटल स्पॉट होतात.

Malaika Arora-Arjun Kapoor Viral Video
Jui Gadkari : जुई गडकरीचे पुढचं पाऊल; नवीन क्षेत्रात पदार्पण, फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com