Ashok Saraf SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ashok Saraf : अशोक मामांना कलाविश्वातील मोठा पुरस्कार जाहीर, शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

Ashok Saraf Award : मराठी मनोरंजनसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना कलाविश्वातील मोठा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Shreya Maskar

अशोक सराफ यांना कलाविश्वातील मोठा पुरस्कार जाहीर झाला.

अशोक मामांना 'संगीतसूर्य केशवराव भोसले पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे.

अशोक सराफ यांची सध्या 'अशोक मा.मा' ही मालिका सुरू आहे.

मराठीचे दिग्गज अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांची सध्या कलर्स मराठीवर 'अशोक मा.मा' ही मालिका सुरू आहे. ते प्रेक्षकांचे बंपर मनोरंजन करत आहे. आजवर त्यांनी आपल्या अभिनयाचे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांना कामाच्या पोचपावतीच्या रुपात अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले आहे. अशात आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिनेते अशोक सराफ यांना 'केशवराव भोसले पुरस्कार' जाहिर (sangeet Surya Keshavrao Bhosale Award In Kolhapur ) करण्यात आला आहे.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना कोल्हापूर मधील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेकडून 'संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. कोल्हापूरमध्ये 4 ऑक्टोबरला पुरस्कार सोहळा पार पडेल. अशोक सराफ यांना मानपत्र आणि 51 हजार रुपये दिले जाणार आहेत. ही माहिती अध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांनी दिली आहे.

अशोक सराफ यांनी कोल्हापूरात अनेक चित्रपटांचे शूटिंग केले आहेत. गेल्या वर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते डॉ.शरद भुथाडिया यांना देण्यात आला होता. अलिकडेच अशोक मामा यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. सध्या मनोरंजनसृष्टीतून अशोक सराफ यांच्यावर शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. गोविंदराव टेंबे रंगमंदिरात चार ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाचला पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.

अशोक सराफ यांचे कोल्हापूरसोबत खास कनेक्शन आहे. अशोक सराफ यांना सर्वत्र 'मामा' या नावाने हाक मारली जाते. 'मामा' या नावामागे एक खास किस्सा आहे. अशोक सराफ यांना सेटवर सर्व अशोकजी म्हणायचे मात्र कोल्हापूरकडच्या लोकांना ते अवघडल्यासारखे वाटायचे. कोल्हापूरमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक कॅमेरामनने त्यांच्या मुलीला अशोक सराफ यांची ओळख 'अशोक मामा' अशी करून दिली.त्यानंतर शेटवर त्यांना सर्वच 'अशोक मामा' या नावाने हाक मारू लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: दिप्तीनंतर आता कीर्ती! बाथरुममध्ये कोंडलं, बेदम मारलं; १०लाखांसाठी अमानुष छळ; आणखी एका विवाहितेनं संपवलं आयुष्य

चंद्रपूरचा महापौर भाजपचा की काँग्रेसचा? महापालिकेची सूत्रं 'मातोश्री'च्या हाती? VIDEO

Special Report : महायुतीत ठणाठणी! शिंदेसेनेचं भाजपच्या नाईकांना ओपन चॅलेंज

व्हॉट्सअॅपसाठी पैसे मोजावे लागणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Zilla Parishad Election: भाजपनं ठाकरेंचा उमेदवार पळवला? पनवेल तहसील कार्यालयावर शेकापचा राडा, माघार घेण्यावरून रंगला राजकीय ड्रामा

SCROLL FOR NEXT