Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी सैनिकांना सन्मान, १६ बीएसएफ जवांनाना शौर्य पुरस्कार प्रदान

Gallantry awards : केंद्र सरकारने ७९ व्या स्वातंत्र्यदिवसाच्या पूर्वसंध्येला ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या बीएसएफच्या १६ जवानांना शौर्य पदक मिळणार असल्याचे जाहीर केले.
Operation Sindoor
Operation Sindoor x
Published On
Summary
  1. ऑपरेशन सिंदूरमधील अदम्य शौर्यासाठी १६ बीएसएफ जवानांना शौर्य पदकांचा सन्मान.

  2. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारची घोषणा, वीर जवानांचा गौरव.

  3. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील लक्ष्यांवर यशस्वी कारवाई.

Gallantry Awards : ऑपरेशन सिंदूरदरम्यान अतुलनीय शौर्य आणि पराक्रम दाखवल्याबद्दल सीमा सुरक्षा दलाच्या म्हणजेच बीएसएफच्या सोळा जवानांना शौर्य पदक प्रदान करण्यात आले आहे. शौर्य पदक प्रदान करण्यात आलेल्या जवानांमध्ये सब इन्स्पेक्टर व्यास देव, कॉन्स्टेबल सुद्दी राभा, अभिषेक श्रीवास्तव, सहाय्यक, सेनानायक आणि कॉन्स्टेबल भूपेंद्र बाजपेयी यांचा समावेश आहे.

केंद्र सरकारने ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शौर्य पदकांबाबतची घोषणा केली. बीएसएफच्या सोशल मीडिया अकाउंटवर यासंबंधित पोस्ट शेअर करण्यात आली. 'या स्वातंत्र्यदिनी, १६ शूर सीमा रक्षा दलातील जवानांना ऑपरेशन सिंदूर दरम्यान त्यांच्या अदम्य शौर्य आणि अतुलनीय पराक्रम दाखवल्याबद्दल शौर्य पदक प्रदान केले जात आहे. ही पदके भारतीय सीमा सुरक्षा दलावरील देशाच्या विश्वासाचे प्रतीक आहेत, असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

Operation Sindoor
Pune : महाराष्ट्राचा मर्दानी खेळ थेट जर्मनीमध्ये! पुण्यात प्रशिक्षण घेत परदेशी तरुणीने सुरू केले वर्ग

केंद्र सरकारने १६ बीएसएफ जवानांना शौर्य पदके प्रदान केली आहेत. यात एक उप कमांडंट रँक अधिकारी, दोन सहाय्यक कमांडंट आणि एक निरीक्षक यांचा समावेश आहे.

  • १. उपनिरीक्षक व्यास देव

  • २. कॉन्स्टेबल सुद्दी राभा

  • ३. अभिषेक श्रीवास्तव, सहाय्यक कमांडंट

  • ४. कॉन्स्टेबल भूपेंद्र बाजपेयी

  • ५. कॉन्स्टेबल राजन कुमार

  • ६. कॉन्स्टेबल बसवराज शिवप्पा सुनकडा

  • ७. हेड कॉन्स्टेबल ब्रिज मोहन सिंग

  • ८. कॉन्स्टेबल देपेश्वर बर्मन

  • ९. इन्स्पेक्टर उदय वीर सिंग

  • १०. रवींद्र राठोड, उपकमांडंट

  • ११. इन्स्पेक्टर देवी लाल

  • १२. हेड कॉन्स्टेबल साहिब सिंग

  • १३. कॉन्स्टेबल कंवर सिंग

  • १४. एएसआय राजप्पा बी टी

  • १५. कॉन्स्टेबल मनोहर झलक्सो

  • १६. आलोक नेगी, सहाय्यक कमांडंट

Operation Sindoor
Maharashtra Politics : छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM ला धक्का, बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

२२ एप्रिल रोजी काश्मीर खोऱ्यामधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या दहशतवादी हल्ल्याला प्रत्त्युतर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. या ऑपरेशन अंतर्गत ७ ते १० मे दरम्यान भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी आणि लष्करी तळांना लक्ष्य केले होते. या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेले होते.

Operation Sindoor
Shocking : २ वर्षांपूर्वी भरती; भाईंदरमध्ये नेमणूक, अवघ्या २४ वर्षांच्या पोलिसानं मृत्यूला कवटाळलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com