Shocking : २ वर्षांपूर्वी भरती; भाईंदरमध्ये नेमणूक, अवघ्या २४ वर्षांच्या पोलिसानं मृत्यूला कवटाळलं

Bhayandar : भाईंदरमध्ये एका पोलीस शिपायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन वर्षांपूर्वी भाईंदर पोलीस ठाण्यात त्यांची नेमणूक झाली होती. भरतीनंतर तो भाईंदरमध्ये भाडेतत्त्वावर राहत होता.
Bhayandar
Bhayandarx
Published On

Bhayandar Shocking : भाईंदरमधून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आज (१४ ऑगस्ट) भाईंदरमध्ये एका पोलीस शिपायाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस शिपायाने गळफास घेत आयुष्य संपवल्याचे म्हटले जात आहे. या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून यासंदर्भात तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदरमध्ये गुरुवारी एका पोलीस शिपायाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रितिक भाऊसाहेब चव्हाण (वय - २४ वर्षे) असे या गळफास घेतलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात २०२३ च्या भरतीमध्ये रितिक चव्हाण भरती झाला होता.

Bhayandar
Accident : खासदाराच्या कार्यालयासमोर भयंकर अपघात! आधी उडवलं, नंतर फरफटत नेलं; अपघाताचा थरारक VIDEO

२०२३ मध्ये भरतीनंतर रितिकची भाईंदर पोलीस ठाण्यात नेमणूक होती. तो मूळचा नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे. पोलीस भरती झाल्यानंतर तो भाईंदर पश्चिमेच्या बेकरी गल्लीमध्ये भाडेतत्त्वावर राहत होता. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन रितिकचा मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

Bhayandar
Maharashtra Politics : छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM ला धक्का, बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

भाईंदरमध्ये एका २४ वर्षीय रितिक चव्हाण या पोलीस शिपायाने गळफास घेत आत्महत्या केली. रितिकने आत्महत्या का केली याचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी रितिकचा मृतदेह पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी दिली.

Bhayandar
Jalna Crime : भावाबहिणीच्या नात्याला काळीमा! ७ वर्षीय चिमुरडीवर १४ वर्षीय चुलत भावाकडून अत्याचार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com