Maharashtra Politics : छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM ला धक्का, बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

Maharashtra Political News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत एमआयएमपक्षातून गफ्फार कादरी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमला धक्का बसला आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politicsx
Published On

माधव सावरगावे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra : उपमुख्यमंत्री अजित पवार हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. आज (१४ ऑगस्ट) अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा कार्यक्रम पार पडला. एमआयएम म्हणजेच ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षातून गफ्फार कादरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. यामुळे एमआयएम पक्षाला मोठा धक्का बसला असल्याचे म्हटले जात आहे.

अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये गफ्फार कादरी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाला. प्रवेशाच्या वेळी कादरी यांनी असदुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले. 'असदुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील हे वक्फ बोर्डाच्या नावावर खोटे बोलतात. त्यांच्या नावावर अनेक जमिनी आहेत. इम्तियाज जलील यांचे वक्फ बोर्डाच्या जागेवर ऑफिस आहे, असे वक्तव्य गफ्फार कादरी यांनी केले.

Maharashtra Politics
Maharashtra Politics : पुण्यात राष्ट्रवादीला खिंडार, भाजपचा अजित पवारांना मोठा धक्का

असदुद्दीन ओवैसी हे मुस्लिमांची फसवणूक करत आहेत. ओवैसी यांनी माझ्यावर गद्दार असा आरोप केला होता, त्यावरुन मी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ते लोकांना अल्लाह, रसूलच्या नावावर खोटे बोलतात. एकदा तर रक्ताची गरज आहे म्हणून मी दहा बाटल्या रक्त दिल्याची फेकमफाकी केली होती, असे गफ्फार कादरी म्हणाले.

Maharashtra Politics
Accident : खासदाराच्या कार्यालयासमोर भयंकर अपघात! आधी उडवलं, नंतर फरफटत नेलं; अपघाताचा थरारक VIDEO

गफ्फार कादरी यांच्या पक्षप्रवेशादरम्यान अजित पवार यांनी भाषण केले. भाषणाची सुरुवात त्यांनी हिंदीतून केली. हम सब हिंदुस्तानी है बस इतनीही हमारी पहचान है असे अजित पवार म्हणाले. 'पक्षाची रचना अशीच आहे, जी यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा आहे. महाराष्ट्रातील सर्वांना सोबत घेऊन जात आहोत. सर्वधर्म समोर ठेवून पुढे जातोय. यशवंतराव चव्हाणांचा वारसा पुढे घेऊन आम्ही जातोय, असे उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले.

Maharashtra Politics
Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी; मनोरंजन विश्वावर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com