Maharashtra Politics : पुण्यात राष्ट्रवादीला खिंडार, भाजपचा अजित पवारांना मोठा धक्का

Maharashtra Political News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. या सोहळ्यात पुण्यातील भोर, मुळशी येथील अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
Maharashtra Politics
Maharashtra Politicssaam tv
Published On
Summary
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला खिंडार

  • अनेक पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

  • पुणे जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढली

Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथ सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक दिग्गज नेते, पदाधिकारी पक्षांतर करत असल्याचे चित्र दिसत आहे. निवडणुकीपूर्वी पुण्यात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला धक्का दिला आहे. पुण्यात भाजपची ताकद वाढली आहे.

पुणे जिल्ह्यातील भोर, मुळशी तालुक्यातील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आज (१३ ऑगस्ट) भाजपमध्ये प्रवेश केला. मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती पांडुरंग ओझरकर, सुखदेव तापकीर, सुरेश हुलावळे, अमित कंधारे, पांडुरंग राक्षे, मोरेश्वर घारे या अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांनी भाजपची वाट धरली आहे.

Maharashtra Politics
Election Commission : भाजप मतांची चोरी करतेय, गुजराती लोक बिहारचे व्होटर; माजी उपमुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

भाजप प्रदेश कार्यालयामध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. भोर मुळशी मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्त्वाखाली प्रवेशाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त शरद पवार गट आणि अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला रवींद्र चव्हाण, मंत्री जयकुमार गोरे, आमदार प्रसाद लाड, आमदार विक्रांत पाटील, नवनाथ बन, भरत राऊत, माधवी नाईक यांनी उपस्थिती लावली होती.

Maharashtra Politics
Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, महिला नेत्या करणार अजित पवार गटात प्रवेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्त्व स्वीकारणाऱ्यांचे पक्षामध्ये स्वागत आहे. कार्यकर्त्यांनी ज्या विश्वासाने भाजपामध्ये प्रवेश केला आहे, त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. पक्षप्रवेशामुळे पुण्यात भाजपची शक्ती वाढल्याचे म्हटले जात आहे.

Maharashtra Politics
BJP : १५ ऑगस्टला चिकन-मटण विक्री बंदीचा निर्णय काँग्रेसचाच, विरोधानंतर सत्ताधारी भाजपचं स्पष्टीकरण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com