
Meat Ban Row in Maharashtra : कल्याण-डोबिंवलीमध्ये १५ ऑगस्ट रोजी चिकन-मटन शॉपवर बंद ठेवण्याचा आदेश महानगरपालिकेने दिला. कल्याण-डोबिंवली महापालिकेच्या निर्णयामुळे राजकारण तापले आहे. आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह विरोध पक्षांतील नेत्यांनी या भूमिकेला विरोध केला आहे. कल्याण-डोबिंवली पाठोपाठ, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव या ठिकाणी देखील १५ ऑगस्ट रोजी मांसविक्री बंदी असणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मांसविक्री बंदी प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. कोणी काय खावे आणि काय खाऊ नये हे ठरवणे चुकीचे आहे. अशा प्रकारे बंदी घालणे अयोग्य आहे, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. आता यावर भाजपने भूमिका मांडली आहे. १५ ऑगस्ट रोजी मांसविक्रीवर बंदी असावी हा निर्णय काँग्रेसच्या काळामध्ये घेण्यात आला होता. तत्कालीन काँग्रेस सरकारने १२ मे १९८८ रोजी मांसविक्री बंदीसंबंधित निर्णय घेतला होता, असे सत्ताधारी भाजपने म्हटले आहे.
'१५ ऑगस्ट रोजी कत्तलखाने आणि मासांहार विक्री दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतले आहेत. आदित्यजी ठाकरे आणि जितेंद्रजी आव्हाड या निर्णयाला विरोध करत आहेत. पण हे करताना त्यांनी किमान इतिहास आठवायला हवा. कारण हा निर्णय ना आज घेतला, ना सध्याच्या सरकारचा आहे. प्रत्यक्षात हा निर्णय १२ मे १९८८ रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतला होता, आणि तेव्हापासून तो लागू आहे.
या नियमानुसार प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती, राम नवमी आणि महावीर जयंती अशा राष्ट्रीय आणि धार्मिक महत्त्वाच्या दिवशी महापालिकांना कत्तलखाने बंद ठेवण्याचा अधिकार आहे. तेही थेट आमसभेत नगरसेवक ठराव करून. म्हणजेच हा निर्णय स्थानिक लोकप्रतिनिधींच्या एकमताने घेतला जातो', असे स्पष्टीकरण भाजपद्वारे देण्यात आले आहे.
'मजेशीर गोष्ट म्हणजे, मविआ सरकारच्या काळातही हाच निर्णय तसाच कायम ठेवण्यात आला होता. त्या वेळी मात्र या नेत्यांच्या जिभेवर कुलूप लावलं होतं. आज मात्र राजकारणाचा बाजार मांडताना “अत्याचार” चालू आहे अशा थाटात बोलत आहेत.जरा तोंड उघडण्यापूर्वी हा निर्णय वाचून घ्या!', ही पोस्ट भाजपचे समन्वयक नवनाथ बन यांनी एक्सवर शेअर केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.