Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी; मनोरंजन विश्वावर शोककळा

Basanti Chatterjee Death : लोकप्रिय बंगाली अभिनेत्री बसंत चॅटर्जी यांचे त्यांच्या राहत्या घरात वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. कर्करोगाचा सामना करत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Basanti Chatterjee Death News
Basanti Chatterjee Death Newsx
Published On
Summary
  • प्रसिद्ध बंगाली अभिनेत्रीचे निधन

  • ८८ व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

  • मनोरंजन विश्वात शोककळा

Actress Death News : मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. जेष्ठ अभिनेत्री बसंती चॅटर्जी यांचे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांनी ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बऱ्याच कालावधीपासून बसंती चॅटर्जी कॅन्सर या गंभीर आजाराशी झुंज देत होत्या. मागील काही महिन्यांमध्ये आजारपणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. बुधवारी (१३ ऑगस्ट) पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

बसंती चॅटर्जी यांनी बंगाली चित्रपटसृष्टीत खूप काम केले होते. ५० वर्षांपेक्षा जास्त कारकिर्दीत त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. फक्त चित्रपटच नाही, तर टीव्ही मालिकांमध्येही बसंती चॅटर्जी झळकल्या होत्या. गीता एलएलबी या मालिकेच्या शूटिंगदरम्यान त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर त्यांनी काम करणे बंद केले.

Basanti Chatterjee Death News
सर्वात मोठी बातमी! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना ईडीकडून अटक

गेल्या काही वर्षांपासून बसंती चॅटर्जी कर्करोगाचा सामना करत होत्या. रुग्णालयातील आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्यांना घरी आणण्यात आले होते. देखरेखीसाठी बसंती चॅटर्जी यांच्या घरी नर्स होती. मागील काही दिवसात त्यांची प्रकृती खालावली होती. अशा परिस्थितीतही त्या अभिनयाशी जोडलेल्या होत्या.

Basanti Chatterjee Death News
Maharashtra Politics : पुण्यात राष्ट्रवादीला खिंडार, भाजपचा अजित पवारांना मोठा धक्का

बसंती चॅटर्जी यांचा प्रवास रंगभूमीपासून झाला. सुरुवातीच्या काळात त्या रंगमंचावर काम करत असत. नाटकांमध्ये काम करण्याचा अनुभवाचा फायदा त्यांना झाला. यामुळे सिनेमाच्या पडद्यावर त्यांना वेगळी ओळख मिळाली होती. बसंती चॅटर्जी यांच्या निधनाने बंगाली चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनीही चॅटर्जी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

Basanti Chatterjee Death News
Maharashtra Politics : ...तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार! रोहित पवारांचं सूचक वक्तव्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com