Jalna Crime : भावाबहिणीच्या नात्याला काळीमा! ७ वर्षीय चिमुरडीवर १४ वर्षीय चुलत भावाकडून अत्याचार

Jalna Crime News : जालन्यामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच्या सात वर्षीय चुलत बहिणीवर अत्याचार केले आहेत. या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Crime news
Crime newsx
Published On
Summary
  • जालना शहरातील खळबळजनक घटना

  • सात वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

  • मुलीचा अल्पवयीन चुलत भाऊ पोलिसांच्या ताब्यात

अक्षय शिंदे पाटील, साम टीव्ही, प्रतिनिधी

Jalna : जालन्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालना शहरात एका सात वर्षांच्या चिमुकलीवर तिच्याच सख्ख्या चुलत भावाने अत्याचार केला. घटना घडल्यानंतर पीडित मुलीच्या आईने तिला रुग्णालयात दाखल केले आहे. अत्याचार प्रकरणी जालना शहरातील पोलिसांनी विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहरामधील नवीन जालना भागात एका सात वर्षांच्या बालिकेवर तिच्या १४ वर्षीय सख्ख्या चुलत भावाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अत्याचाराच्या घटनेनंतर बालिकेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली.

Crime news
Accident : खासदाराच्या कार्यालयासमोर भयंकर अपघात! आधी उडवलं, नंतर फरफटत नेलं; अपघाताचा थरारक VIDEO

अत्याचाराच्या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी पीडित मुलीवर तातडीने उपचार सुरु केले. या गंभीर प्रकरणात मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Crime news
Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी; मनोरंजन विश्वावर शोककळा

एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच्या ७ वर्षीय चुलत बहिणीवर अत्याचार केले. पीडित मुलीच्या आईने केलेल्या फिर्यादीनंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणातील विधी संघर्ष बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून हा गुन्हा पिंक मोबाईल पथकाकडे सोपवण्यात आला आहे. सदर बाजार पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Crime news
Maharashtra Politics : रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला झटका, बड्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com