Ashok Sharaf: सलमान खानने अशोक सराफ यांचा गळाच कापला; ३३ वर्षानंतर मामांनी सांगितला शुटिंगचा थरारक किस्सा

Salman Khan accidentally injured Ashok Saraf: एका चित्रपटाचे शूटिंग करताना सलमान खानकडून अभिनेते अशोक सराफ यांचा गळा चिरला गेला होता. शूट करताना झालेल्या दुखापतीचा किस्सा स्वत: अशोक सराफ यांनी सांगितलाय.
Salman Khan accidentally injured Ashok Saraf
Ashok Saraf reveals he was injured by Salman Khan during the shoot of the 1992 film Jagriti saam tv
Published On
Summary
  • जागृती चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अशोक सराफ जखमी झाले होते.

  • सलमान खानच्या एका फाईट सीनमुळे त्यांच्या गळ्याला दुखापत झाली.

  • अशोक सराफ यांनी हा किस्सा रेडिओ नशा या चॅनेलवर सांगितला.

  • अशोक सराफ यांनी या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली होती.

चित्रपटातील सीन शूट करताना कलाकारांना इजा होत असते. 'कुली' चित्रपटातील फाईट सीन शूट करताना अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली होती. असाच अपघात सलमान खानच्या एका चित्रपटाच्या शूटिंगवेळी घडला होता. अभिनेता सलमान खानमुळे मराठी अभिनेते अशोक सराफ यांना इजा झाली होती. शूट करताना सलमान खानने अशोक सराफ यांचा गळा चिरला होता.

'जागृती' चित्रपटाचा सीन शूट करताना हा अपघात घडला होता. खुद्द अशोक सराफ यांनी या अपघाताचा किस्सा सांगितलाय. अशोक सराफ यांनी रेडिओ नशा या चॅनेलसोबत गप्पा मारताना हा किस्सा सांगितलाय. 1992 मध्ये जागृती चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात मराठी अभिनेते अशोक सराफ यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती. बहुतेक हिंदी चित्रपटात विनोदी कलाकाराची भूमिका साकारणाऱ्या अशोक सराफ यांनी याच चित्रपटात गंभीर आणि नकारात्मक भूमिका साकारली होती. त्याची भूमिका चाहत्यांना खूप आवडली होती.

Salman Khan accidentally injured Ashok Saraf
Pivali Sadi Song: संसाराच्या गाड्यातून वैयक्तिक आयुष्याला सांभाळणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी; 'पिवळी साडी' गाण्याची प्रेक्षकांमध्ये क्रेझ

जागृती सिनेमात अभिनेता सलमान खान आणि करिश्मा कपूरही मुख्य भूमिकेत होते. चित्रपटातील थरारक किस्सा सांगताना अशोक सराफ म्हणाले एक सीन शूट करताना दुखापत झाली होती. एका सीनच्या शूटिंगसाठी खरा चाकू वापरला गेला होता. सलमान खान आणि अशोक सराफ यांच्यात हा सीन शूट करण्यात आला होता. त्यावेळी सलमान खानने अशोक सराफ यांना मागून पकडलेलं असतं. आणि त्यांच्या गळ्याभोवती चाकू लावलेला असतो. त्याच्यावेळी अशोक सराफ यांचा गळा चिरला गेला.

अशोक सराफ म्हणाले, "सलमान खान माझ्या गळ्यावर चाकू ठेवून उभा होता. तो चाकू खरा होता. त्याचे टोक धारदार होतं. त्यामुळे माझा गळा थोडास कापला गेला होता. डायलॉग्स सुरू होताच मी त्याच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न केला. सलमान जोरात दाबत होता, आणि मी लगेच सांगितलं – 'थोडं हळू दाबा, येथे कापतंय."

Salman Khan accidentally injured Ashok Saraf
Pivali Sadi Song: संसाराच्या गाड्यातून वैयक्तिक आयुष्याला सांभाळणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी; 'पिवळी साडी' गाण्याची प्रेक्षकांमध्ये क्रेझ

दरम्यान सराफ यांनी सुरक्षिततेसाठी चाकू कसा पकडावा यावर सूचना दिली होती, पण कॅमेरा अँगलमुळे ते शक्य नव्हतं. त्यावेळी मी सलमान खानला उलटा चाकू पडण्यास सांगितलं होतं. पण कॅमेरा चालू असल्यानं उलटा चाकू दिसला असता. त्यामुळे मीही तसेच राहू दिले. पण सीन होईपर्यंत गळ्याला खोल जखम झाली होती, असं अशोक सराफ यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com