Express Train : महाराष्ट्राला मिळाली आणखी एक नवीन एक्स्प्रेस; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

New Bhusawal-Nagpur Express Approved: महाराष्ट्रासाठी आणखी एका एक्स्प्रेस ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुसावळ-नागपूर एक्स्प्रेसला मंजुरी मिळाल्याची माहिती दिली. ही गाडी कोणत्या मार्गाने धावणार, संभाव्य थांबे कोणते आणि कधी सुरू होणार? जाणून घ्या सविस्तर.
Railway
Railwaysaam tv
Published On: 

Bhusawal Nagpur Express train latest news : उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाला जोडणारी नवीन एक्स्प्रेस लवकरच सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नव्या एक्स्प्रेसची घोषणा केली. भुसावळ आणि नागपूर या दोन स्थानकांदरम्यान नवीन एक्स्प्रेस धावणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पोस्टद्वारे दिली. केंद्र सरकारने या नव्या एक्स्प्रेसला मंजुरी दिली आहे.

भुसावळ-नागपूर दरम्यान नवीन एक्स्प्रेस कधीपासून धावणार, याबाबत सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या एक्स्प्रेसमुळे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ हे दोन विभाग जवळ येणार आहेत. एक्स्प्रेस मंजूर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. "महाराष्ट्रातील जनतेची मागणी मान्य करत भुसावळ ते नागपूर दरम्यान नवीन भुसावळ-नागपूर एक्स्प्रेस सुरू करण्यास मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवजी यांचे मनःपूर्वक आभार. या नवीन एक्स्प्रेसमुळे महाराष्ट्रातील प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि सुलभ रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे," असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

भुसावळ आणि नागपूर एक्सप्रेस कोणत्या मार्गाने जाणार?

ही ट्रेन नेहमीच्या अकोला–बडनेरा–वर्धा या थेट विदर्भ मार्गाऐवजी भुसावळ – खंडवा – इटारसी – बैतूल – आमला – पांढुर्णा – नागपूर या मध्य प्रदेशातून जाणाऱ्या मार्गाने धावण्याची शक्यता आहे.

कोणत्या स्थानकांवर थांबणार?

भुसावळ जंक्शन (BSL), बुरहानपूर, नेपानगर, खंडवा जंक्शन, तलवडिया, छनेरा, खिरकिया, हरदा, टिमरनी आणि इटारसी जंक्शन, घोडाडोंगरी, बैतूल, आमला जंक्शन, मुलताई आणि पांढुर्णा नरखेड, काटोल आणि नागपूर जंक्शन (NGP) या स्थानकावर गाडी थांबण्याची शक्यता आहे.

Railway
सांगली हादरली! आधी एकजण खाली उतरला, त्याला वाचवण्यासाठी दुसरा गेला, अन् पाहता पाहता तिघांचाही मृत्यू; नेमकं काय घडलं?

वेळापत्रक व तारीख :

रेल्वे मंत्रालयाने या गाडीच्या परिचालनाला अधिकृत हिरवा कंदील दाखवला आहे. केंद्राकडून मंजूरी मिळाली आहे. पण गाडी सुरू होण्याची नेमकी तारीख, आठवड्याचे दिवस आणि सविस्तर वेळापत्रक मध्य रेल्वेकडून लवकरच स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार आहे.

Railway
बंडखोर आमदारांच्या गटाला हायकोर्टाचा धक्का! प्रमुख नेत्याची निवड अवैध, विधानसभाध्यक्षांचा निर्णयही बदलला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.