Kolhapur : जर्मन शेफर्ड, डॉबरमन श्वान मालकांवर होणार कारवाई; कोल्हापूर महापालिकेचा काय आहे फतवा वाचा

Kolhapur News : भटक्या कुत्र्यांमार्फत होणारे हल्ले आणि त्यांच्या दहशतीमुळे नागरिक हैराण झाले असताना महापालिकेने मात्र विविध जातींच्या पाळीव श्वानासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करून संभ्रम निर्माण केलेला आहे
Kolhapur News
Kolhapur News Saam tv
Published On

रणजित माजगावकर 
कोल्हापूर
: कोल्हापुरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस मोठ्या प्रमाणावर सुरू असतानाच कोल्हापूर महानगरपालिकेने पाळीव कुत्र्यांसाठी काढलेल्या जाहिरातीची चांगलीच चर्चा रंगली आहे. अर्थात मोकाट कुत्र्यांवर कारवाई न करत श्वान पालन करणाऱ्यांसाठी अजब फतवा महापालिकेने काढला असून श्वानांवर आणि त्यांच्या मालकांवर कारवाई करण्यासंदर्भात काढलेल्या जाहिरातीमुळे महापालिकेचा अजब कारभार समोर आला आहे.

कोल्हापुरात दुचाकीवरून फिरायची सोय नाही. एखाद्या गल्लीतून जायचं तर कुठून भटका कुत्रा अंगावर येईल हे सांगणे अवघड आहे. कारण भटक्या कुत्र्यांनी कोल्हापुरात हैदोस घातला असतानाच महापालिकेचा मात्र अजब कारभार समोर आला आहे. भटक्या कुत्र्यांना झुकतं माप देत महापालिकेने पाळीव कुत्र्यांवरच कारवाईचा बडगा उगारला आहे. तशी जाहिरात देखील महापलिकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

Kolhapur News
Kolhapur : कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; शाही दसऱ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा

श्वान फिरविताना मनपाचे नियम 

रोटविलर, पिटबुल, जर्मन शेफर्ड, डॉबरमन जातींच्या कुत्र्यांचा स्वभाव हा अतिहिंस्त्र असतो. त्यामुळे त्यांना फिरवताना काही नियम महापालिकेने बनवले आहेत. ते नियम पाळले नाही, तर थेट श्वान जप्त करून मालकावर कारवाई केली जाणार आहे. तशी जाहिरातच महापालिकेने काढली आहे. श्वानांना फिरवताना चेन किंवा बेल्ट लावणे, तोंडाला मझल लावणे. त्या मझलचा श्वानाला त्रास होणार नाही याची दक्षता घेणे, असे आदेश कोल्हापूर महानगरपालिकेने काढले आहेत.

Kolhapur News
Maval : वडगाव मावळ न्यायालयाची उभी राहणार नवीन इमारत; १०९ कोटीचा निधी देण्याचा निर्णय

मोकाट कुत्र्यांऐवजी पाळीव कुत्रांसाठी नियम 
महानगर पालिकेकडे या विविध जातींच्या श्वानांची कुठलीही नोंद अथवा माहिती नाही. कोल्हापूर शहरात घडलेल्या एकाददुसऱ्या घटनेमुळे महापालिकेने या विविध जातींच्या श्वानांनाच दोषी ठरवले आहे. हे करत असताना मात्र कोल्हापूर शहरात धुमाकूळ घालणाऱ्या भटक्या कुत्र्यांना झुकतं माप दिल्याचे पाहायला मिळत आहे. अर्थात हे मोकाट कुत्रे पकडून त्यांना दूर सोडणे किंवा त्यांचे निर्बिजीकरण करण्याची मोहीम राबविण्याकडे दुर्लक्ष आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com