Kedar Shinde : पुन्हा एकदा हास्याचा फवारा उडणार? 'जत्रा २'बद्दल केदार शिंदेंनी केला मोठा खुलासा

Jatra 2 Update : दिग्दर्शक केदार शिंदेंनी 'जत्रा 2' बद्दल मोठी अपडेट दिली आहे. 'जत्रा ' चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. केदार शिंदे नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊयात.
Jatra 2 Update
Kedar ShindeSAAM TV
Published On
Summary

'जत्रा 2'बद्दल दिग्दर्शक केदार शिंदेंनी मोठी अपडेट दिली आहे.

'जत्रा'मध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्रिया बेर्डे , क्रांती रेडकर, कुशल बद्रिके असे मोठे कलाकार झळकले.

'जत्रा 'ची गाणी आजही सोशल मीडियावर गाजत आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde ) कायम त्यांच्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. आजवर त्यांनी अनेक हिट चित्रपट केले आहे. त्यांच्या चित्रपटांची कथा प्रेक्षकांना खूप आवडते. अलिकडेच त्यांचा 'झापुक झुपूक' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. यात 'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सुरज चव्हाण झळकला. आता सोशल मीडियावर 'जत्रा 2' (Jatra 2 ) चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. अलिकडेच 'जत्रा' चित्रपटातील कलाकारांचे रियुनियन पार पडले. ज्याचा व्हिडीओ कलाकारांनी शेअर केला.

'जत्रा' चित्रपटातील कलाकारांचे रियुनियन पाहून 'जत्रा 2' च्या चर्चांना उधाण आले. आता 'जत्रा' चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. एका मिडिया मुलाखतीत केदार शिंदे यांनी 'जत्रा 2'बद्दल मोठे विधान केले आहे. केदार शिंदे म्हणाले, "आम्ही 'जत्रा 2' ची घोषणा केली होती. माझ्याकडे कथा देखील आहे. मात्र तेव्हा भरतने सांगितले की आपल्या चित्रपटाची कथा दुसऱ्या सिनेमाशी मिळतीजुळती आहे. "

शेवटी केदार शिंदे म्हणाले, "आपण चौकशी करूया. तेव्हा चित्रपटाचा काही भाग एका सिनेमाशी जळता निघाला. मग आम्ही तो सिनेमा करणे थांबवले.'जत्रा 2' मला मनापासून करावासा वाटतो. मात्र चित्रपटाने एक बेंचमार्क सेट केला आहे. जर त्याच्या जवळपास गेलो नाही तर चांगला ब्रँड खराब होईल."

'जत्रा' चित्रपट

'जत्रा' चित्रपट 2005मध्ये रिलीज झाला. या चित्रपटातील गाणी आजही सुपरहिट आहे. 'कोंबडी पळाली गाणं' ऐकताच प्रेक्षक डान्स करू लागतात. या चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. या चित्रपटात तगडी स्टार कास्ट पाहायला मिळाली. ज्यांचा भन्नाट अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्रिया बेर्डे , क्रांती रेडकर, कुशल बद्रिके, अंकुश चौधरी, उपेंद्र लिमये यांचा समावेश होता.

Jatra 2 Update
Marathi New Serial : "ती परत येतेय..."; नवीन हॉरर मालिकेची घोषणा, मुख्य भूमिकेत झळकणार 'बिग बॉस'चा विजेता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com