मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) होय. अंकुश 'स्टाईल आयकॅान' म्हणून महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. आज (31 जानेवारी)अंकुश चौधरीचा वाढदिवस आहे. अंकुश आज 52 वर्षांचा झाला आहे. अंकुश चौधरीने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक दमदार गिफ्ट दिले आहे. अंकुश चौधरीने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.
अंकुश पहिल्यांदाच एका दमदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. पोस्टरमध्ये अर्जुनचा करारी आणि धाडसी लूक दिसत असून प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे एक पर्वणी ठरणार आहे. यापूर्वी प्रेक्षकांनी अंकुशला रोमँटिक, ॲक्शन हिरोच्या अंदाजात पाहिले आहे. मात्र या चित्रपटात अंकुश एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. सध्या तरी या चित्रपटात कोण कलाकार झळकणार हे समोर आले नसले तरी लवकरच याबद्दलची माहिती प्रेक्षकांसमोर येईल.
चित्रपटाचे निर्माते विक्रम शंकर म्हणतात, "या चित्रपटाच्या माध्यमातून मी मराठी सिनेसृष्टीत निर्माता म्हणून पदार्पण करत आहे. यापूर्वी मी विविध भाषेत चित्रपटांची निर्मिती केली आहे. परंतु मला मराठीबद्दल नेहमीच कौतुक राहिले आहे. मुळात मराठी प्रेक्षक जाणकार आहेत. त्यांना वैविध्यपूर्ण विषय आवडतात. हा विषयही खूप वेगळा आहे आणि म्हणूनच मी या चित्रपटाची निवड केली. त्यात अंकुश चौधरीसारखा प्रतिभावान अभिनेता या चित्रपटाला लाभला आहे, त्यामुळे हा एक उत्तम योग जुळून आला आहे. अंकुश मराठीतील एवढा मोठा अभिनेता असूनही त्याचे आम्हाला खूप सहकार्य लाभले. आज आमच्या संपूर्ण टीमकडून ही त्याला वाढदिवसाची भेट."
'पी. एस. आय अर्जुन' हे अंकुश चौधरीच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. त्याने चित्रपटात पी. एस. आय अर्जुन देशमानेची भूमिका साकारली आहे. 'पी.एस.आय.अर्जुन' निर्मित व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट आहे. तर भूषण पटेल दिग्दर्शक आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.