
पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिस प्रशासन तणावाखाली आहे. या दरम्यान, एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. वानवडी भागातील एका हुक्का पार्लर चालकाकडून पोलीस उपनिरीक्षक हफ्ता घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संबंधित पोलिस उपनिरीक्षक विशाल पवार हा हुक्का पार्लर चालवणाऱ्यांकडून 20 हजार रुपयांचा हप्ता घेत होता.
या प्रकरणाची तपासणी केल्यानंतर, पुणे पोलिस प्रशासनाने विशाल पवारवर त्वरित कारवाई केली आणि त्याला निलंबित केले. हुक्का पार्लर चालकाला परवानगी देत असताना, तो आपला गुन्हेगारी धंदा चालवताना देखील पोलिस उपनिरीक्षकाची मदत घेत होता. पोलिस विभागाने हप्तेबाजीच्या या प्रकरणावर कडक कारवाई केली असून, सखोल तपास सुरू आहे.
पुण्यातील वानवडी परिसरात एका हॉटेलमध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पुणे पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. हॉटेल चालकाचा मोबाईल तपासल्यानंतर वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार याच्याशी संबंधित असलेल्या संपर्काचे धागे समोर आले.
पोलिसांनी तपास केल्यावर समजलं की, हुक्का पार्लर चालवणारा हॉटेल चालक दरमहा 20 हजार रुपयांचा हप्ता पवारला देत होता. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिस प्रशासनाने त्वरित कारवाई करत विशाल पवार याला निलंबित केले आहे. हप्तेबाजीच्या या प्रकरणाने पोलिस दलावर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.