Pune Crime: पुण्यात चाललंय काय? थेट सोसायटीमध्ये घुसून चोरट्याने महिलेची सोनसाखळी हिसकावली, घटना CCTV मध्ये कैद

Kothrud And Karve Nagar Crime News: कोथरूड आणि कर्वेनगरमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत. कोथरूडमध्ये मॉर्निंग वॉकसाठी जात असलेल्या महिलेचा मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावला, तर कर्वेनगरमधील एका सोसायटीत घुसून महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली.
Pune Crime
Pune CrimeSaam Tv
Published On

राज्यात चोरीच्या घटना वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. पुणे शहराच्या विविध भागांत देखील चोरीच्या घटना घडत आहेत. कोथरूड आणि कर्वेनगरमध्ये अशाच घटना समोर आल्या आहेत. कोथरूडमध्ये, मॉर्निंग वॉकसाठी जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी चोरले, तर कर्वेनगरमध्ये एका सोसायटीत घुसून चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. या घटनांमुळे पुण्यातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांच्या कार्यवाहीला अधिक कडक बनवण्याची मागणी केली जात आहे.

पुण्यातील कर्वेनगर भागात एक धक्कादायक चोरीची घटना घडली आहे. पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी जात असलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने हिसकावले. सीसीटीव्ही फुटेजनुसार, चोरटा दुचाकीवरून आलेला होता आणि त्याने महिलेला पाळत ठेऊन तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. वृद्ध महिलेसाठी या परिस्थितीत पाठलाग करणे शक्य नव्हते. घटना काल म्हणजेच २२ तारखेला बुधवारी सकाळी ६:४२ वाजता नवसह्याद्री सोसायटीच्या चंदन पथावर घडली.

Pune Crime
Nagpur News: नागपूरच्या माजी उपमहापौरांना अटक, पुनम बँक घोटाळा प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

महिला ज्या मार्गावर फिरायला जात होत्या, त्याच मार्गावर चोरट्याने अचानक दृष्य उचलून मंगळसूत्र लंपास केले. हिसकवताना मंगळसूत्राचा एक भाग तुटला आणि खाली पडला, मात्र चोरटा परत आला आणि पडलेला भाग उचलून घेऊन गेला. या घटनेमुळे कर्वेनगर परिसरात सुरक्षा आणि पोलिसांच्या कार्यवाहीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे, आणि या प्रकारे चोरी होणे नागरिकांच्या मनातील भीती वाढवत आहे.

Pune Crime
Sangli News: माजी आमदार विलासराव जगताप आणि तम्मनगौडा रवी पाटील यांची भाजपमधून हकालपट्टी, नेमकं कारण काय?

पुण्याच्या कोथरूड भागात एक आणखी चोरीची घटना समोर आली आहे. कर्वेनगरमधील घटनेनंतर आता कोथरूडमध्ये सुद्धा चोरी झाली आहे. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी एका महिलेची सोनसाखळी हिसकावली. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. चोरट्यांनी थेट सोसायटीच्या पार्किंगमध्ये घुसून महिलेची सोनसाखळी लंपास केली. या प्रकारामुळे पुण्यात पोलिसांची सुरक्षा क्षमता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. नागरिकांनी पोलिसांच्या कार्यवाहीबद्दल चिंता व्यक्त केली आहे, आणि चोरीच्या घटनांवर तात्काळ नियंत्रण आणण्याची मागणी केली जात आहे.

Pune Crime
Ulhasnagar Crime: तरुणावर प्राणघातक हल्ला, मदत करणाऱ्या महिलेचा ओढणीने गळा आवळण्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोथरूड भागातील नचिकेत सोसायटीमध्ये सायंकाळी ७:३० वाजता एक दाम्पत्य शतपावली करून घरी परतत होते. सोसायटीमध्ये प्रवेश केल्यानंतर, दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. पतीने चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु दुचाकीवर असल्यामुळे ते पळून गेले. या घटनेबद्दल पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com