Breaking News

Ulhasnagar Crime: तरुणावर प्राणघातक हल्ला, मदत करणाऱ्या महिलेचा ओढणीने गळा आवळण्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद

Ulhasnagar News: उल्हासनगरच्या कॅम्प ५ परिसरातील वीर तानाजी नगरमध्ये एका तरुणावर प्राणघातक हल्ला आणि दोन महिलांवर मारहाणीची धक्कादायक घटना घडली आहे.
Ulhasnagar Crime
Ulhasnagar Crimegoogle
Published On: 

उल्हासनगरच्या कॅम्प ५ परिसरातील वीर तानाजी नगरमध्ये एका तरुणावर प्राणघातक हल्ला आणि दोन महिलांवर मारहाणीची धक्कादायक घटना घडली आहे. शोएब नावाचा तरुण रात्री मामीच्या घरी जेवण करून घरी परतत असताना हा प्रकार घडला. रस्त्यावर उभ्या असलेल्या विशाल दारकुंडे आणि नान्या या तरुणांजवळून जाताना चुकून शोएबचा विशालला धक्का लागला. या क्षुल्लक कारणावरून विशालने शोएबला शिवीगाळ करत त्याच्यावर हात उगारला.

वाद अधिक चिघळत जात विशालने डोक्यात दगड मारून शोएबला गंभीर जखमी केले. शोएबला वाचवण्यासाठी त्याच्या दोन्ही मामी तिथे आल्या असता विशाल आणि नान्याने त्यांनाही मारहाण केली. यामध्ये एका मामीला मोठा धक्का बसला. आरोपींनी तिच्या गळ्यातील ओढणीने गळा आवळून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. या हिंसक प्रकारामुळे शोएबच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्या मामीच्या मानेला गंभीर इजा झाली आहे.

Ulhasnagar Crime
Melghat Crime: मेळघाटमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना; अंधश्रद्धेतून नग्न धिंड काढली, महाराष्ट्रात चाललंय काय?

जखमींना तातडीने शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणावर पोलिसांकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Ulhasnagar Crime
Viral Video: रेल्वे पोलिसाची 'गुंडगिरी', महिलेला चापट लगावली, व्हिडीओ व्हायरल

या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शुल्लक कारणावरून झालेल्या हिंसक घटनेनंतर परिसरातील लोकांत चिंता वाढली आहे. या घटनेवर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपींना अटक करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी त्वरित पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Ulhasnagar Crime
Viral Video: पत्नी बॉयफ्रेंडसोबत कारमध्ये दिसल्यावर पतीचा राग अनावर, थेट बोनटवर चढला, पुढे काय घडलं..., पाहा व्हायरल VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com