Viral Video: रेल्वे पोलिसाची 'गुंडगिरी', महिलेला चापट लगावली, व्हिडीओ व्हायरल

Viral Video On Railway: आरपीएफ कॉन्स्टेबलने ट्रेनमध्ये एका महिलेला चापट मारली होती. व्हिडिओ व्हायरल होण्यानंतर संबंधित कॉन्स्टेबलवर कारवाई केली गेली आणि त्याला निलंबित करण्यात आले. घटना केल्यानंतर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे.
Viral Video
Viral Videosaam tv
Published On

रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) च्या हेड कॉन्स्टेबल ओम प्रकाश यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे, ज्यात ते एका महिलेला चापट मारताना दिसत आहेत. या घटनेनंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमठू लागल्या आहेत. व्हिडिओमध्ये ओम प्रकाश महिलेसोबत वाद करत असताना तिच्या चेहऱ्यावर चापट मारताना स्पष्टपणे दिसत आहेत. या प्रकारानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात आली आणि त्यांना निलंबित करण्यात आले. रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, तात्काळ योग्य ती कारवाई केली आहे.

हेड कॉन्स्टेबल ओम प्रकाश राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यात तैनात आहेत. १४ जानेवारी रोजी रणथंबोर एक्स्प्रेसमध्ये एका महिलेसोबत त्यांचा वाद झाला. रिपोर्टनुसार, जनरल कोचमधील एका प्रवाशाने चैन ओढून ट्रेन थांबवली होती. ओम प्रकाश या घटनेच्या तपासासाठी कोचजवळ आले आणि चेन पुलिंगबद्दल महिला आणि त्यांच्यात वाद सुरू झाला. या वादाच्या दरम्यान ओम प्रकाशने महिलेला चापट मारली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर ओम प्रकाश यांना निलंबित करण्यात आले.

Viral Video
Vira Video: ट्रेन प्लॅटफॉर्मवर येण्यापूर्वीच ट्रेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न, पोलिसांनी अनोख्या पद्धतीने पळवला जमाव, पाहा व्हायरल VIDEO

हेड कॉन्स्टेबल ओम प्रकाश वाद सुरू असताना संतापले आणि त्याने महिलेला थप्पड मारली. ही घटना ट्रेनमधील एका प्रवाशाने रेकॉर्ड केली आणि सोशल मीडियावर अपलोड केली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ओम प्रकाशवर कारवाई करण्यात आली आणि त्याला निलंबित केले. ही घटना सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. महिलेशी झालेल्या वादामुळे ओम प्रकाशच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करून त्याला निलंबित केल्याची माहिती मिळाली आहे.

Viral Video
Viral Video: पत्नी बॉयफ्रेंडसोबत कारमध्ये दिसल्यावर पतीचा राग अनावर, थेट बोनटवर चढला, पुढे काय घडलं..., पाहा व्हायरल VIDEO

ट्विटरच्या @ManojSh28986262 अकांउटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यात कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "महिला ट्रेनच्या जनरल डब्यातून प्रवास करत होती, हा उद्धटपणा आणि वर्दीतील लोकांचा हात नेहमीच दुर्बलांवर का काम करतो?" व्हिडिओमध्ये सवाई माधोपूर येथील आरपीएफ हेड कॉन्स्टेबल ओमप्रकाश महिलेला थप्पड मारताना दिसत आहेत. या व्हिडिओनंतर रेल्वे प्रशासनाने ओमप्रकाशवर कारवाई केली आणि त्याला निलंबित केले. ही घटना सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

Viral Video
SSC-HSC Result: यंदा दहावी-बारावीचा निकाल लवकर लागणार, शिक्षण मंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com