Sangli News: माजी आमदार विलासराव जगताप आणि तम्मनगौडा रवी पाटील यांची भाजपमधून हकालपट्टी, नेमकं कारण काय?

Vilasrao Jagtap and Ravi Patil : भाजपने सांगली जिल्ह्यातील जतचे माजी आमदार विलासराव जगताप आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती तम्मनगौडा रवी पाटील यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे जाहीर केले आहे.
Vilasrao Jagtap and Ravi Patil
Vilasrao Jagtap and Ravi Patilgoogle
Published On

विधानसभा निवडणूकीसांगलीच्या जतचे माजी आमदार विलासराव जगताप आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती तम्मनगौडा रवीपाटील यांची भाजपाने पक्षातून हकालपट्टी केल्याचं जाहीर केले आहे. मात्र यावरून माजी सभापती व भाजपचे नेते तम्मनगौडा रवी पाटील यांनी प्रश्न उपस्थित करत भाजपला खडे बोल सुनावले आहेत. जत तालुक्यामध्ये भाजपा पक्ष वाढवण्याचा हा बहुमान आहे का? असा सवाल तम्मनगौडा रवी पाटील यांनी केला आहे.

त्याचबरोबर भाजप सचिवाकडून करण्यात आलेल्या कारवाईला आपण जुमानत नसल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुढील निर्णय कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन होईल असे ही तम्मनगौडा रवी पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सांगण्यावरून मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर असताना आपल्यावर हा कारवाईचा उद्योग करण्यात आल्याचा आरोप देखील तम्मनगौडा रवी पाटील यांनी केला आहे.

Vilasrao Jagtap and Ravi Patil
Nagpur News: नागपूरच्या माजी उपमहापौरांना अटक, पुनम बँक घोटाळा प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

जत विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करून दोन नेत्यांनी पक्षाच्या निर्णयाला धक्का दिला होता. त्यांच्या या कृतीमुळे अधिकृत उमेदवारांचे नुकसान झाल्याचे मानले जात आहे. यामुळे पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी या नेत्यांवर पक्षविरोधी कारवाई करण्यात आली आहे. भाजपने या निर्णयाद्वारे पक्षशिस्त पाळण्याचा स्पष्ट संदेश दिला असून, अशा प्रकारच्या वर्तनाला पक्षात स्थान मिळणार नाही, असे ठामपणे सांगितले आहे. जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या नेत्यांसाठी ही कारवाई एक धडा ठरेल, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हटले आहे.

Vilasrao Jagtap and Ravi Patil
Maharashtra Weather: शेती पिकांसाठी धोका; महाराष्ट्रातील 'या' भागांत पावसाचा अंदाज, हवामान खात्याचा अंदाज काय?

लोकसभा निवडणुकीदरम्यान माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करत विलासराव जगताप यांनी भाजपला राजीनामा दिला होता. तरीही, त्यांच्या पक्षविरोधी हालचालींना महत्त्व दिले गेले. त्यांच्या बंडखोरीमुळे जत तालुक्यात भाजपला राजकारणात अडचणींचा सामना करावा लागला. त्यांच्या वर्तमनाच्या कृतीमुळे पक्षाच्या स्थानिक युतीला मोठा धक्का बसला.

Vilasrao Jagtap and Ravi Patil
Solapur Crime: सोलापूरमध्ये बांग्लादेशींची घुसखोरी; ५ महिला ताब्यात, १.४१ लाख रुपयांची रोख, ४६ हजार रुपयांचे मोबाईल जप्त

जत विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा निर्णय गोपीचंद पडळकर यांच्यापर्यंत जाहीर झाल्यानंतर तम्मनगौडा रवी पाटील यांनी २७ ऑक्टोबर रोजी स्वेच्छेने भाजपचा राजीनामा दिला होता आणि अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. त्यानंतर, पक्षातून काढल्याचे पत्र कशासाठी दिले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांचे म्हणणे आहे की, या पत्राचे कारण फक्त गोपीचंद पडळकर यांचा दबाव आणि आग्रह असावा. भाजप प्रदेश कार्यालयाच्या प्रमुखांनी त्यांचे आदेश दिल्यामुळे हे पत्र काढण्यात आले, असे रवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com