Maharashtra Weather: शेती पिकांसाठी धोका; महाराष्ट्रातील 'या' भागांत पावसाचा अंदाज, हवामान खात्याचा अंदाज काय?

Maharashtra Weather Update: अरबी समुद्रातील हवामान बदलांमुळे महाराष्ट्रात पाऊस होत आहे. दक्षिण केरळजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत, ज्याचा परिणाम राज्याच्या वातावरणावर दिसून येत आहे.
Maharashtra Weather
Maharashtra Weatheryandex
Published On

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. राज्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांत ३०-४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या भागांतील पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. हिवाळ्यात होणाऱ्या या पावसामुळे शेतीला मोठा फटका बसणार आहे. पुणे येथील ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी या भागांत पावसाचा इशारा दिला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

अरबी समुद्रातील हवामान बदलांमुळे महाराष्ट्रात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण केरळजवळ अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून अनेक भागांत पाऊस आणि गारपीट झाली आहे. जवळपास १२ ते १३ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यांत ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra Weather
Maharashtra Weather : थंडी गायब, हिवाळ्यात निघतोय घाम; पश्चिम महाराष्ट्रात हवामानात बदल, राज्यात कुठे कसं हवामान?

जळगाव जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ज्वारी, केळी आणि हरभरा पिकांना मोठा फटका बसला आहे. जळगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये ज्वारी आणि पिके जमीनदोस्त झाली असून, हरभऱ्याच्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत आहे.

Maharashtra Weather
National Park: १४ वर्षांनंतर मुंबईत 'छावा'चा जन्म, संजय गांधी उद्यानात आनंदोत्सव

रावेर आणि यावल तालुक्यांतील केळी उत्पादक शेतकरीही मोठ्या नुकसानाला सामोरे जात आहेत. तूर पिके काढणीच्या अवस्थेत असताना झालेल्या पावसामुळे तुरीच्या उत्पादनावरही परिणाम होईल, असा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरू झालेले नाहीत. पंचनामे लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आले असून, कृषी विभागाने तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.

Maharashtra Weather
SSC-HSC Result: यंदा दहावी-बारावीचा निकाल लवकर लागणार, शिक्षण मंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली

मध्यरात्री कल्याण-डोंबिवली परिसरात अचानक अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या, ज्यामुळे तापलेल्या वातावरणाला काहीसा गारवा मिळाला. साधारण वीस मिनिटे पडलेल्या या पावसाने वातावरण थंड झाले. नाशिक जिल्ह्यासह विदर्भातील अनेक भागांमध्येही अवकाळी पावसाचे प्रमाण दिसून आले. या पावसाने काही भागांतील नागरिकांना गारवा दिला असला, तरी शेती पिकांवर याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Maharashtra Weather
Vira Video: ट्रेन प्लॅटफॉर्मवर येण्यापूर्वीच ट्रेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न, पोलिसांनी अनोख्या पद्धतीने पळवला जमाव, पाहा व्हायरल VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com