National Park: १४ वर्षांनंतर मुंबईत 'छावा'चा जन्म, संजय गांधी उद्यानात आनंदोत्सव

Sanjay Gandhi National Park: बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'तील सिंह सफारीमध्ये पाळणा हलला आहे. 2009 मध्ये बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रवींद्र आणि शोभा ही सिंहाची जोडी आणण्यात आली होती.
National Park
National Park
Published On

मुंबईतील बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सिंह सफारीमधील 'मानसी' नावाच्या मादीने गुरुवारी रात्री एका छाव्याला जन्म दिला. गुजरातहून आणलेली 'मानस' आणि 'मानसी' ही जोडी पर्यटकांचे आकर्षण बनली होती. या सिंहांच्या जोडीला 2022 मध्ये जुनागढ येथून आणले गेले होते. 2024 मध्ये मानसी सिंहीण आजारी पडली होती, आणि ती 18 दिवस काहीही खाल्ली नव्हती. अनेकांनी तिची आशा सोडली होती, पण काही तज्ज्ञांच्या ठाम विश्वास ती बरी झाली. आता तिने आपल्या पिल्लाला जन्म दिला, ज्यामुळे उद्यानातील कर्मचारी आणि पर्यटक आनंदी आहेत.

सिंह सफारीतील 'मानसी' आणि 'मानस' यांच्या मिलनाची प्रक्रिया सोपी नव्हती. सुरुवातीला मानस घाबरवून आणि मानसीला डरकाळी फोडून तिला ओरबाडायचा. मानसी घाबरून पळून जात होती. पण उद्यानातील तज्ज्ञांनी धीर न सोडता त्यांना पुन्हा पुन्हा एकत्र आणले. हळूहळू, ते एकमेकांच्या सान्निध्यात आरामदायक झाले आणि प्रेमात पडले. 30 सप्टेंबर रोजी त्यांचा शेवटचा मिलन झाला आणि मानसीचा मिलन कालावधी संपला.

National Park
Maharashtra Weather : थंडी गायब, हिवाळ्यात निघतोय घाम; पश्चिम महाराष्ट्रात हवामानात बदल, राज्यात कुठे कसं हवामान?

नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या तपासणीत, मानसी गरोदर असल्याचे समजले, ज्यामुळे उद्यानात आनंदाची लहर पसरली. काल रात्री साडे नऊ वाजता मानसीने पिल्लाला जन्म दिला. तब्बल १४ वर्षानंतर छावा जन्मला. छावा आणि मानसी दोघेही सुखरुप असून, सध्या त्यांना वन कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवले गेले आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी खास देखरेख केली जात आहे.

National Park
Vira Video: ट्रेन प्लॅटफॉर्मवर येण्यापूर्वीच ट्रेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न, पोलिसांनी अनोख्या पद्धतीने पळवला जमाव, पाहा व्हायरल VIDEO

2009 मध्ये बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रवींद्र आणि शोभा ही सिंहाची जोडी आणण्यात आली होती. गोपा आणि जेस्पा हे त्यांच्या पिल्ले होते, आणि हे कुटुंब पर्यटकांसाठी आकर्षण ठरले होते. काही वर्षांपूर्वी शोभाचा मृत्यू झाला, आणि कुटुंब त्रिकोणी बनले. 2021 मध्ये गोपाला आजाराने घेरले, त्यानंतर तिचा मृत्यू झाला. 2022 मध्ये 17 वर्षीय रवींद्र आणि जेस्पा देखील मृत पावले. त्या नंतर, गुजरातमधून मानस आणि मानसी या सिंहांच्या जोडीलाही उद्यानात आणण्यात आले, ज्यामुळे सिंह सफारीला नविन जीवन मिळाले आणि चांगले दिवस आले.

National Park
Viral Video: पत्नी बॉयफ्रेंडसोबत कारमध्ये दिसल्यावर पतीचा राग अनावर, थेट बोनटवर चढला, पुढे काय घडलं..., पाहा व्हायरल VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com