Bhiwandi Crime: भिवंडीत घुसखोर बांगलादेशींविरोधात मोठी कारवाई, ९ महिलांना अटक

Bangladeshi Nationals: पोलिस प्रशासनाने बांगलादेशी नागरिकांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम हाती घेतली आहे. भिवंडी पोलिस उपायुक्त कार्यक्षेत्रात गेल्या दोन महिन्यांत ३० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली असून, कारवाई जोरदारपणे सुरू आहे.
Bhiwandi Crime
Bhiwandi Crimegoogle
Published On

पोलिस प्रशासनाने बांगलादेशी नागरिकांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे. भिवंडी पोलिस उपायुक्त कार्यक्षेत्रात गेल्या दोन महिन्यांत ३० हून अधिक बांगलादेशी नागरिकांची धरपकड करण्यात आली आहे. यामध्ये भिवंडी गुन्हे शाखेने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. ठाकूरपाडा येथील एका चाळीत तर एकूण नऊ बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. यासोबतच त्यांना आसरा देणाऱ्या चाळीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून माहिती मिळाली होती की, ठाकूरपाडा येथील एका चाळीत बांगलादेशी नागरिक आपली ओळख लपवून वास्तव्य करत आहेत. त्यानुसार, पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई केली. ठाकूरपाडा येथील नविन मराठी शाळेच्या पाठीमागे दिपक गंगाराम ठाकरे यांच्या चाळीत बांगलादेशी नागरिक सापडले.

Bhiwandi Crime
Pune Crime: मध्य प्रदेशातून पुण्यात येऊन करायचा चोऱ्या, पोलिसांनी १५० सीसीटीव्ही तपाले, अशा आवळ्या सोनसाखळी चोराच्या मुसक्या

नऊ महिलांना अटक, चाळ मालकावर गुन्हा

भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून नऊ बांगलादेशी महिलांना पकडले. त्यात सिमा बेगम सिराज बेग (वय २७), रेखा अनिसराम राम, रूपा अनिसराम राम उर्फ सती इक्बाल इक्चाल हुसैन अक्तर (वय २४), अंजनी हबीज शा (वय २३), शारदा बन्सी साहू (वय ४२), ममता शारदा साहू (वय २६), पायल राजु साहू (वय २८), पिंकी शारदा साहू (वय ४५) आणि काजल शांत्रवन्सी साहू (वय २०) या महिलांचा समावेश आहे. या महिलांनी कोणत्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय भारताच्या सीमेत प्रवेश केला आणि भिवंडीमध्ये राहण्यास सुरवात केली.

Bhiwandi Crime
Pune Crime: पुण्यात चाललंय काय? थेट सोसायटीमध्ये घुसून चोरट्याने महिलेची सोनसाखळी हिसकावली, घटना CCTV मध्ये कैद

या महिलांच्या बांगलादेशी नागरिकतेचे प्रमाण सापडल्याने त्यांच्यावर स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यासोबतच चाळीचे मालक दिपक गंगाराम ठाकरे याच्याविरोधातही कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. या सर्व कारवायांमुळे भिवंडी पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कडक कारवाई सुरू ठेवली आहे.

Bhiwandi Crime
Nagpur News: नागपूरच्या माजी उपमहापौरांना अटक, पुनम बँक घोटाळा प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com