Ketaki Mategaonkar : माझी ओळख अन् माझं अस्तित्व..., गायिका केतकी माटेगावकरच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Ketaki Mategaonkar New Post: मराठमोळी गायिका केतकी माटेगावकरने एक खास पोस्ट सोशल मीडिया शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने आपले संगीतावरील प्रेम व्यक्त केले आहे.
Ketaki Mategaonkar New Post
Ketaki MategaonkarSAAM TV
Published On

आपल्या गोड आवाजाने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar) कायच तिच्या उत्तम गायनासाठी ओळखली जाते. ती मनोरंजन विश्वातील उत्कृष्ट गायिका आहे. तिने आजवर अनेक मराठी गाणी लिहिली आहेत. तिने आपल्या संगीत प्रवासाविषयी एक खास पोस्ट केली आहे. यात तिने आपल्या संगीत प्रवासाविषयी अनुभव शेअर केला आहे. केतकीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

केतकी माटेगावकरने आजवर गाण्यासोबत अनेक दमदार चित्रपट केले आहेत. यात तानी, शाळा, काकस्पर्श' या चित्रपटांचा समावेश आहे. अनेक मालिकांसाठी केतकीने पार्श्वगायन देखील केले आहे. केतकी माटेगावकरने नेमकं पोस्टमध्ये काय म्हटले आहे, जाणून घ्या.

केतकी माटेगावकर पोस्ट

#संगीतमाझीओळख

गाणं ही माझी ओळख, माझं अस्तित्व… मी अनेक वर्षांपासून या प्रवासात आहे. रियाझ, स्टेज, रेकॉर्डिंग, संगीताचा अभ्यास...हेच सगळं माझं आयुष्य आहे. प्रत्येक सूर, प्रत्येक गाणं काहीतरी शिकवून जातं, आणखी पुढे जाण्याची ऊर्जा देतं.

मराठी संगीताची जादू जगभर पोहोचावी, आपल्या संगीताचा आत्मा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, ही माझी खरी जिद्द आहे आणि हाच माझा ध्यास आहे. एक मराठी गायिका असण्याचा अभिमान आहे! ही ओळख घेऊन अजून पुढे जायचंय, अजून खूप गायचंय!

अशी खास पोस्ट केतकी माटेगावकरने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

गाजलेला चित्रपट

केतकी माटेगावकर उत्तम गायिकेसोबतच एक चांगली अभिनेत्री देखील आहे. तिने 'टाईमपास' चित्रपटातून प्रेक्षकांचे बंपर मनोरंजन केले आहे. 'टाईमपास' चित्रपट 2014 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातील दगडू आणि प्राजूची जोडी आजही चाहत्यांच्या मनावर घर करून आहे. या चित्रपटात केतकी माटेगावकरसोबत अभिनेता प्रथमेश परब पाहायला मिळाला.

Ketaki Mategaonkar New Post
Ramesh Deo : मुंबईतील 'या' मार्गाला मिळाले रमेश देव यांचे नाव, आनंद व्यक्त करत अजिंक्य देव म्हणाला...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com