
भारतात सध्या कोल्डप्लेचा फिव्हर सुरु आहे. मुंबईत ग्रँड इव्हेंट झाल्यानंतर आता कोल्डप्ले इव्हेंट अहमदाबादला जाऊन पोहोचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोल्डप्लेचा इव्हेंट पार पडला. या इव्हेंटला तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. ब्रिटीश बँड ग्रुप सध्या भारत दौऱ्यावर आहे.
हा कॉन्सर्ट पाहण्यासाठी तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान फॅन्सचा उत्साह आणखी वाढला, जेव्हा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मोठ्या स्क्रिनवर दिसला. बुमराह या कॉन्सर्टला उपस्थित झालाय, हे स्वत: ख्रिस मार्टीनने सांगितलं आणि त्याच्यासाठी खास गाणंही गायलं. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
कोल्डप्लेचा भारतात खूप क्रेझ आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या या कॉन्सर्टमध्ये तब्बल १ लाख ३४ हजार चाहत्यांनी हजेरी लावली होती. यासह अहमदाबादमध्ये इतिहास घडला. यापूर्वी आशिया खंडात झालेल्या कुठल्याही कार्यक्रमाला इतकी गर्दी कधीच जमली नव्हती. या लाखोंच्या गर्दीत जसप्रीत बुमराह देखील शो पाहण्यासाठी उपस्थित होता.
मात्र सुरुवातीला कोणाला भनकही लागली नव्हती. शो सुरु असताना तिसऱ्या सेटमध्ये अचानक कॅमेऱ्याची नजर जसप्रीत बुमराहवर पडली आणि संपूर्ण स्टेडियममध्ये बुमराह..बुमराह नामाचा गजर झाला. त्यानंतर मार्टीनने देखील बुमराहचे कौतुक केले.
मार्टीनने जसप्रीत बुमराहसाठी खास गाणं देखील गायलं. तो म्हणाला, ' जसप्रीत बुमराह, माय ब्युटिफूल ब्रदर.. द बेस्ट बॉलर इन द होल ऑफ क्रिकेट..वी डू नॉट इन्जॉय डिस्ट्रॉइंग इंग्लंड विद द विकेट्स आफ्टर विकेट्स...' मार्टीन बुमराहसाठी हे गाणं गात होता. त्यावेळी आयोजकांनी एक व्हिडिओ प्ले केला. ज्यात जसप्रीत बुमराह इंग्लंडच्या फलंदाजांच्या दांड्या गुल करत होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ख्रिस मार्टीनने जसप्रीत बुमराहचं कौतुक करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील त्याने बुमराहचं कौतुक केलं आहे. मात्र यापूर्वी त्याने बुमराहला कमी लेखलं होतं. आता त्याने आपली चूक सुधारली.
मुंबईत झालेल्या शो मध्ये देखील त्याने बुमराहचा उल्लेख केला होता. आता अहमदाबादमध्ये झालेल्या इव्हेंटमध्ये स्वत: बुमराह देखील उपस्थित होता. बुमराह काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळून मायदेशी परतला आहे. सध्या तो दुखापतीमुळे संघाबाहेर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.