IND vs ENG, Live Streaming: भारत- इंग्लंड तिसरा सामना फुकटात पाहता येणार; कसं? जाणून घ्या

India vs England Live Streaming Details: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना फुकटात कुठे पाहता येणार ? जाणून घ्या.
IND vs ENG, Live Streaming: भारत- इंग्लंड तिसरा सामना फुकटात पाहता येणार; कसं? जाणून घ्या
team indiatwitter
Published On

इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने दमदार कामगिरी करत २-० ने आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील तिसरा सामना राजकोटच्या मैदानावर रंगणार आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघाने कंबर कसली आहे.दरम्यान हा सामना पाहण्यासाठी तुम्हाला राजकोटला जाण्याची गरज नाही, तर तुम्ही घरबसल्या हा सामना फुकटात पाहू शकता.

IND vs ENG, Live Streaming: भारत- इंग्लंड तिसरा सामना फुकटात पाहता येणार; कसं? जाणून घ्या
IND vs ENG 3rd T20I: तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग ११ बदलणार? धाकड फलंदाजाला मिळणार संधी

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेली टी -२० मालिका तुम्ही डीडी स्पोर्ट्सवर फुकटात पाहू शकता. ही मालिका जिओ आणि हॉटस्टारवर प्रक्षेपित केली जात आहे. तुम्ही जिओ किंवा हॉटस्टारवर पाहू शकता. पण तुमच्याकडे सबस्क्रिप्शन असणं गरजेचं आहे.

IND vs ENG, Live Streaming: भारत- इंग्लंड तिसरा सामना फुकटात पाहता येणार; कसं? जाणून घ्या
Ind vs Eng : एकटा तिलक इंग्लंडला शेवटपर्यंत भिडला! ६ चेंडूत ६ धावांची गरज असताना असा फिरला सामना

भारतीय संघ २-० ने आघाडीवर

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला होता.

तर दुसरा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने २ गडी राखून विजय मिळवला. आता तिसरा सामना जिंकून भारतीय संघ ही मालिका ३-० ने आपल्या नावावर करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

IND vs ENG, Live Streaming: भारत- इंग्लंड तिसरा सामना फुकटात पाहता येणार; कसं? जाणून घ्या
IND vs ENG: आर्चरने 150.3KMPH च्या स्पीडने टाकला बॉल, तिलक वर्माने रॉकेट स्पीडने पाठवला मैदानाबाहेर - VIDEO

फिरकीच्या जाळ्यात अडकले इंग्लंडचे फलंदाज

भारतातील खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजांना मदत उपलब्ध असते. त्यामुळे फिरकी गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळत असतो. भारतीय संघाकडून सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत वरुण चक्रवर्ती अव्वल स्थानी आहे.

त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलच नाचवून ठेवलं आहे. वरुणने २ सामन्यात ५ गडी बाद केले आहेत. तर अक्षर पटेलने २ सामन्यात गडी बाद केले आहेत. हार्दिक पंड्या आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com