IND vs ENG 3rd T20I: तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग ११ बदलणार? धाकड फलंदाजाला मिळणार संधी
team indiatwitter

IND vs ENG 3rd T20I: तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग ११ बदलणार? धाकड फलंदाजाला मिळणार संधी

Team India Playing XI For 3rd T20I: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात कशी असेल भारताची प्लेइंग ११? जाणून घ्या.
Published on

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंकडून दमदार खेळ पाहायला मिळाला आहे. पहिल्या सामन्यात अभिषेक शर्मा त्यानंतर दुसऱ्या सामन्यात तिलक वर्माने शानदार फलंदाजी करून भारतीय संघाला २-० ने आघाडी मिळवून दिली आहे.

मालिकेतील तिसरा सामना २८ जानेवारीला संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. हा सामना राजकोटच्या मैदानावर रंगणार आहे. या स्टेडियमची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी चांगलीच फायदेशीर ठरते. भारतीय संघात एकापेक्षा एक स्टार खेळाडूंची भरमार आहे. दरम्यान तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल पाहायला मिळू शकतात. कशी असेल प्लेइंग ११? जाणून घ्या.

IND vs ENG 3rd T20I: तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग ११ बदलणार? धाकड फलंदाजाला मिळणार संधी
Ind vs Eng : एकटा तिलक इंग्लंडला शेवटपर्यंत भिडला! ६ चेंडूत ६ धावांची गरज असताना असा फिरला सामना

या सामन्यातही अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात येऊ शकते. दोघांनी मिळून संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. या सामन्यातही दोघांकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असणार आहे.

तर गेल्या सामन्यातील सामनावीर तिलक वर्मा या सामन्यातही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो. दुसऱ्या सामन्यात जेव्हा सर्व आऊट होऊन माघारी परतले होते, त्यावेळी एकटा तिलक शेवटपर्यंत उभा राहिला आणि भारतीय संघाला विजय देखील मिळवून दिला.

भारताचा कर्णधार गेल्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. मात्र त्याला हवी तशी सुरुवात करून देता आली नव्हती. या सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

भारताचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो. तर नितीश रेड्डी बाहेर झाल्यानंतर संघात स्थान मिळालेला शिवम दुबे सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो.

IND vs ENG 3rd T20I: तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग ११ बदलणार? धाकड फलंदाजाला मिळणार संधी
IND vs ENG 2nd T20I: वरुण-अक्षरच्या फिरकीसमोर इंग्लंडचे फलंदाज ढेर; भारताला जिंकण्यासाठी इतक्या धावांची गरज

यासह वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांच्यावर फिरकी गोलंदाजी गोलंदाजीची जबाबदारी असेल. तर वेगवान गोलंदाजीसाठी मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग यांचा समावेश केला जाऊ शकतो.

अशी असू शकते प्लेइंग ११:

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिग आणि मोहम्मद शमी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com