IND vs ENG 2nd T20I: वरुण-अक्षरच्या फिरकीसमोर इंग्लंडचे फलंदाज ढेर; भारताला जिंकण्यासाठी इतक्या धावांची गरज

India vs England 2nd T2OI Live Updates: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यातही भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली आहे.
IND vs ENG 2nd T20I: वरुण-अक्षरच्या फिरकीसमोर इंग्लंडचे फलंदाज ढेर; भारताला जिंकण्यासाठी इतक्या धावांची गरज
team indiatwitter
Published On

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पाचवा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकला आणि पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान प्रथम फलंदाजी करण्यासाठी इंग्लंडला या डावात ९ गडी बाद १६५ धावा करता आल्या आहेत. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १६६ धावा करायच्या आहेत.

IND vs ENG 2nd T20I: वरुण-अक्षरच्या फिरकीसमोर इंग्लंडचे फलंदाज ढेर; भारताला जिंकण्यासाठी इतक्या धावांची गरज
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! फॉर्ममध्ये असलेला फलंदाज संपूर्ण मालिकेतून बाहेर

भारतीय गोलंदाजांची दमदार सुरुवात

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने या सामन्यातही भारतीय संघाला दमदार सुरुवात करुन दिली. त्याने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी उरलेली कसर पूर्ण केली.

भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर आणि अभिषेक शर्माने प्रत्येकी १-१ गडी बाद केले.

IND vs ENG 2nd T20I: वरुण-अक्षरच्या फिरकीसमोर इंग्लंडचे फलंदाज ढेर; भारताला जिंकण्यासाठी इतक्या धावांची गरज
IND vs ENG,Playing XI: भारतानं टॉस जिंकला, बॉलिंगचा निर्णय; २ प्रमुख खेळाडूंना बसवलं; पाहा प्लेइंग ११

इंग्लंडने केल्या.. धावा

गेल्या सामन्यातील अर्धशतकवीर जोस बटलर या सामन्यातही चमकला. त्याने या डावात ३० चेंडूंचा सामना करत ४५ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने २ षटकार आणि ३ चौकार खेचले. तर हॅरी ब्रुकने १३, लियाम लिव्हिंगस्टनने १३, जेमी स्मिथने २२, ब्रायडन कार्सने ३१ धावांची खेळी केली.

IND vs ENG 2nd T20I: वरुण-अक्षरच्या फिरकीसमोर इंग्लंडचे फलंदाज ढेर; भारताला जिंकण्यासाठी इतक्या धावांची गरज
IND vs ENG: क्यों हिला डाला ना.. वरुणच्या वादळासमोर ब्रुकची बत्तीगुल; पाहा Video

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

इंग्लंड- बेन डकेट, फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ, जेमी ओव्हर्टन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड

भारत (Playing XI):

संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com