IND vs ENG: क्यों हिला डाला ना.. वरुणच्या वादळासमोर ब्रुकची बत्तीगुल; पाहा Video

Varun Chakravarthy Clean Bowled Harry Brook: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या सामन्यातही वरुण चक्रवर्तीने हॅरी ब्रुकला क्लिन बोल्ड करत माघारी धाडलं आहे.
IND vs ENG: क्यों हिला डाला ना.. वरुणच्या वादळासमोर ब्रुकची बत्तीगुल; पाहा Video
harry brooktwitter
Published On

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडचा सामना प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. दरम्यान या सामन्यातही वरुण चक्रवर्ती इंग्लंडच्या फलंदाजांवर भारी पडल्याचे पाहायला मिळाले आहे.

IND vs ENG: क्यों हिला डाला ना.. वरुणच्या वादळासमोर ब्रुकची बत्तीगुल; पाहा Video
IND vs ENG,Playing XI: भारतानं टॉस जिंकला, बॉलिंगचा निर्णय; २ प्रमुख खेळाडूंना बसवलं; पाहा प्लेइंग ११

चक्रवर्तीच्या वादळात ब्रुकची बत्तीगुल

इंग्लंडचे फलंदाज वेगवान गोलंदाजांना चांगलं खेळून काढतात पण फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळताना त्यांना चांगलाच घाम फुटतो. मालिकेतील पहिल्या सामन्यातही वरुणने इंग्लंडच्या ३ फलंदाजांना माघारी धाडलं होतं. या सामन्यात त्याने हॅरी ब्रुकला बाद करत माघारी धाडलंय.

तर झाले असे की, भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

IND vs ENG: क्यों हिला डाला ना.. वरुणच्या वादळासमोर ब्रुकची बत्तीगुल; पाहा Video
IND vs ENG 2nd T20I: आज रंगणार भारत- इंग्लंड दुसरा टी-२० सामना! खेळपट्टी कोणाला साथ देणार? Playing XI कशी असेल?

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला सुरुवातीलाच २ धक्के बसले. त्यानंतर भारतीय संघाकडून सातवे षटक टाकण्यासाठी वरुण चक्रवर्ती गोलंदाजीला आला. त्यावेळी ब्रुक १२ धावांवर फलंदाजी करत होता. ब्रुकने ऑफ स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकला. ब्रुकला वाटलं हा चेंडू टप्पा पडून बाहेर जाईल, पण चेंडू टप्पा पडताच आत आला आणि ब्रुकची दांडी गुल करुन गेला. ब्रुकचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

इंग्लंड- बेन डकेट, फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ, जेमी ओव्हर्टन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड

भारत (Playing XI):

संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com