Chicken Birthday: एक नंबर! कोंबडा नाय केक कापला, जळगावातील कुटुंबाने साजरा केला कोंबड्याचा वाढदिवस, पाहा व्हिडीओ

Chicken Birthday Celebration On 31st December 2024: काल ३१ डिसेंबर रोजी अनेकांनी मासांहारी जेवणावर ताव मारला असेल परंतु अशातच जळगावातील कापडणे कुटुंबाने कोंबड्याचा वाढदिवस साजरा केला आहे.
Cock
Cock
Published On

थर्टी फर्स्ट'च्या नावाखाली दारू, मटन पार्टीमध्ये दरवर्षी लाखो कोंबड्यांची कत्तल केली जात असते. एकीकडे असे चित्र असताना,जळगाव शहरातील हरी विठ्ठल नगर भागातील कापडणे परिवाराने आपल्या कोंबड्याचा वाढदिवस साजरा करून सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

जळगाव शहरातील विक्रम कापडणे हे अनेक वर्ष पासून कोंबडी पालन करीत आहेत.पाच वर्ष पूर्वी त्यांच्या कोंबडीने काही पिले जन्माला घातली होती. मात्र, त्यात एकच पिलू जिवंत राहिले होते. अशातच कोंबडी ही मांजराने पळून नेल्याने,एकट्या पिलाचा सांभाळ कापडणे परिवाराने गेल्या पाच वर्षपासून केला आहे. (Kombda Birthday Celebration)

Cock
Mhada Lottery: खूशखबर! नवीन वर्षात म्हाडाच्या 2500 घरांची लॉटरी निघणार

लहानपासून या कोंबड्याला घरातल्या लहान बाळ प्रमाणे सांभाळ केला असल्याने,या कोंबड्याला आणि कापडणे परिवाराला एकमेका विषयी जिव्हाळा निर्माण झाला आहे. घरातील सदस्याप्रमाणे पाच वर्ष या कोंबड्याला कापडणे कुटुंब सांभाळत आहेत. एकतीस डिसेंबर रोजी येणारा वाढदिवसही ते गेल्या पाच वर्ष पासून आवर्जून करत आहेत. (Chicken Birthday Celebration)

कोंबड्यांचा वाढदिवस साजरा करताना त्याला हार घालून, औक्षण करून आणि केक भरवत वाढ दिवस साजरा केला जातो. विशेष म्हणजे कापडणे परिवाराने आपल्या कोंबड्याच्या जन्मापासून तर आतापर्यंतचे सगळे फोटो देखील सांभाळून ठेवले आहेत.

Cock
Success Story: महाबळेश्वरपेक्षा गोड स्ट्रॉबेरी अकोल्यात, शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

गेल्या पाच वर्षापासून या कोंबड्यांचा सांभाळ करताना,मांजर आणि कुत्र्यांनी या कोंबड्यावर हल्ला करत त्याला जखमी केले होते. मात्र, त्यांच्या तावडीतून सोडवित त्याच्यावर उपचार करून त्याला जीवदान दिल्याचं कापडणे सांगतात.

लहान असताना हे कोंबडीच पिलू चिमणी सारखे दिसत असल्याने त्याच नाव चिमण्या ठेवण्यात आले असून,परिसरात चिमण्या नावाचा कोंबडा आणि त्यांचा सांभाळ करणारे,कापडणे परिवार चर्चेचा विषय बनला आहे.

Cock
Success Story: कॉलेजमध्ये नापास; एकदा नाही तर दोनदा क्रॅक केली UPSC; IAS अनुराग कुमार यांचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com