
यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड आणि प्रतिष्ठित परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा देऊन सरकारी अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु यूपीएससी ही सर्वात अवघड परीक्षा आहे. पहिल्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक करणे अनेकांना जमत नाही. त्यामुळे अपयश आल्यावर अनेकजण पुन्हा प्रयत्न करतात. असंच काहीसं आयएएस अनुराग कुमार यांनी केलं. आयएएस अनुराग कुमार यांनी दोन वेळा यूपीएससी परीक्षा क्रॅक केली परंतु त्यांना दुसऱ्या प्रयत्नात आयएएस पद मिळाले. (Sucess Story)
अनुराग कुमार हे अभ्यासात हुशार होते.परंतु अनेकदा आयुष्यात अपयश येतं. असंच काहीसं अनुराग यांच्यासोबत झालं. ते ग्रॅज्युएशन करताना एकदा नापास झाले होते. तरीही त्यांनी हार मानली नाही.
अनुरा कुमार यांनी आठवीपर्यंतचे शिक्षण हिंदी माध्यमातून घेतले. त्यानंतर त्यांनी इंग्रजी मीडियममध्ये अॅडमिशन घेतले. त्यावेळी सुरुवातीला त्यांना खूप प्रॉब्लेम झाला. परंतु त्यांनी खूप मेहनतीने १० वीत ९० टक्के गुण मिळवले. बारावीतदेखील चांगले गुण मिळवले. त्यानंतर त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये अॅडमिशन घेतले. (Success Story of IAS Anurag Kumar)
अनुराग हे ग्रॅज्युएशनच्या पहिल्याच वर्षी अनेक विषयांमध्ये नापास झाले. त्यानंतर त्यांनी खूप मेहनत घेतली. ग्रॅज्युएशननंतर त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी अॅडमिशन घेतले. याच काळात त्यांनी यूपीएससी परिक्षेची तयारी सुरु केली.
अनुराग यांनी खूप मेहनत केली. २०१७ मध्ये पहिल्याच प्रयत्नात त्यांनी ६७७ रँक मिळवली. परंतु त्यांनी आयएएस अधिकारी व्हायचे आहे. त्यानंतर त्यांनी पुन्हा यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. २०१८ साली त्यांनी ४८ रँक मिळवत आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले. (Inspirational Story)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.